शिवसेनेच्या पुणे शहरप्रमुख पदाचा तिढा कायम राहणार ?
पुणे- शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या करताना शहरप्रमुख पदासाठी २ नगरसेवकांना शब्द देऊनही डावलल्याने आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होते आहे. शिवसेनेत पुणे शहरप्रमुख म्हणून नगरसेवक नाना भानगिरे आणि विशाल धनवडे यांची नियुक्ती होईल असे स्पष्ट चित्र काही महिने होते . पण प्रत्यक्षात निवडी होताना त्यांना डावलले गेले. बाळासाहेब ओसवाल हे देखील सेनेतील जिंकणारे सैनिक म्हणूनच ओळखले जातात .मात्र संघटनेच्या या नव्या कार्यकारिणीसाठी त्यांच्या नावाची चर्चा नव्हती सामान्यांशी आणि सामन्यांच्या प्रश्नांशी वारंवार चळवळी सदृश्य संपर्क आल्याने .पुण्यात या तिन्ही नगरसेवकांनी सेना म्हणून चांगली ताकद निर्माण केली आहे. केवळ यां तिघांसारख्या नगरसेवकांच्या कार्याने शहर आणि परिसरात शिवसेनेचे वारे खळाळते राहिले आहे.
मात्र मुंबईकर शिवसेनानेत्यांनी विजय देशमुख (भोसरी, हडपसर विधानसभा मतदार संघ ), गजानन थरकुडे (शिवाजीनगर ,कोथरूड,पर्वती मतदार संघ ),रमेश कोंडे (बारामती आणि खडकवासला मतदार संघ )आणि संजय मोरे (पुणे कँँटोंंमेंट, कसबा,आणि वडगाव शेरी मतदार संघ ) जिल्हाप्रमुख अशी विधानसभा मतदार संघा प्रमाणे पदे दिल्याने यांच्याच हाथी शिवसेना शहर प्रमुखाची धुरा सोपविल्याचे वृत्त आहे. महापालिकेतील माजी गटनेते संजय भोसले हे देखील संघटनेच्या या नव्या पदांसाठी इच्छुक होते. महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता ठेवणारे आणि शहरात बऱ्याच सामाजिक प्रश्नांवर वादळ निर्माण करण्याची ताकद असलेल्या विद्यमान नगरसेवकांना संघटनेच्या कामापासून का दूर ठेवण्यात येते आहे. त्यांचा शहर शिवसेनेसाठी का उपयोग करवून घेतला जात नाही असे प्रश्न सैनिकांना सतावत आहेत.