पुणे- कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असणा-या संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांचे ओंकारेश्वरजवळील नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले . संभाजी भिडे यांच्यावरील खोटे आरोप मागे घेण्यात यावे. यासाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा काढण्यात येणार होता. परंतू पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भिडे गुरुजींच्या समर्थकांनी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले.भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत , नगरसेवक धीरज घाटे आणि शिवसेना व अन्य संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .
यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे महानगर कार्यवाह प्रा.पराशर मोने म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच भिडे गुरूजी निर्दोष असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोरेगाव-भीमा दंगलीचे खरे गुन्हेगार कोण याचा पोलिसांनी शोध घ्यावा. गुरुजींच्या सन्मानार्थ मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारणे हे दुर्दैवी आहे. परंतू तरीही आम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करणार आहोत. त्यामुळे आम्ही मोर्चा न काढता नदीपात्रात बसून आंदोलन करत आहोत.
कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे, धनंजय देसाई यांना विनाकारण गोवण्यात आले आहे. त्यांच्यावरील खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. कोरेगाव-भीमा दंगलीचे खरे गुन्हेगार उमर खलीद, जिग्नेश मेवानी, बी.जी.कोळसे पाटील आणि एल्गार परिषदेच्या आयोजकांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी. तसेच भिडे गुरुजींविषयी खोटी तक्रार देणा-या महिलेचीही चौकशी व्हावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
माजी खासदार प्रदीप रावत यांनी यावेळी कार्यकर्त्यासमोर केलेले भाषण पहा आणि आंदोलनाची झलक पहा