पुणे – महापालिकेकडून नागरिकांना आकारण्यात येणाऱ्या मिळकतकराच्या 2022-23 या आर्थिक वर्षाच्या सर्व वॉर्डांतील मिळकतींचे वार्षिक करपात्र मूल्य दर्शविणारे ‘आकारणी पुस्तक’आणि संगणकीय आकारणी नोंदणीची माहिती पुणेकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.पुणेकरांना कर आकारणी नोंदी नागरिकांना महिनाभर पाहता येणार असून जागुत पुणेकर आणि कादात्यांनी हे तपासून घ्यावे असे आवाहन मिळकतकर प्रमुख अजित देशमुख यांनी केले आहे.नागरिकंना ही माहीती पाहिल्यानंतर चूकीची नोंद अथवा कर आकारणी झालेली असल्यास कर आकारणी आणि संकलन विभागाकडे 20 डिसेंबर ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजे पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कर आकारणी विभागात तक्रार करता येणार आहे. तर प्रत्येक मिळकतीसाठी स्वतंत्र तक्रार अर्ज करणे आवश्यक असण्यासह मिळकतीच्या मालकानेच तक्रार करणे बंधनकारक असणार आहे. असेही ते म्हणाले.

ते म्हणाले,’येत्या 20 डिसेंबर ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागात पाहता येणार आहेत. त्यामुळे, महापालिकेकडून 2022-23 या आर्थिक वर्षात पाठविलेली बिले या आकारणीनुसारच झालेली आहेत का याची तपासणी करून त्याबाबत काही आक्षेप असल्यास नागरिकांना लेखी तक्रारीही करता येणार आहेत.
महापालिकेकडून दरवर्षी नागरिकांना संबधित आर्थिक वर्षांची मिळकतकराची बिले दिली जातात. ही कर आकारणी करताना महापालिकेकडून निश्चित केलेल्या करपात्र मूल्यानुसार आणि मिळकतीच्या आकारवर कर आकारणी केली जाते. हे कर आकारणीचे बिल महापालिका मिळकतधारकास 31 मार्चच्या आधीच पाठवून देते. त्यामुळे, नागरिकांना 1 एप्रिल पासूनच कराची रक्कम भरणे सोयीचे जाते. मात्र, अनेकदा नागरिकांना कर आकारणी कशी केली आहे.
दर योग्य पध्दतीने तसेच आपल्या भागातील मिळकतींच्या प्रमाणे आहेत का याची माहिती नसते, त्यामुळे अनेकजण गोंधळून जातात, तसेच चूकीचा कर असला तरी भरतात, काही जण तक्रार करतात त्यानंतर समाधान होत नाही तो पर्यंत मिळकतकर भरत नाहीत. त्यामुळे, कर रकमेची थकबाकीही वाढते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीनुसार, महापालिका दरवर्षी नागरिकांना शहरातील सर्व वॉर्डांतील मिळकतींचे वार्षिक करपात्र मूल्य दर्शविणारे “आकारणी पुस्तक’ पाहण्यासाठी उपलब्ध करून देते.
दरम्यान, नागरिकंना ही माहीती पाहिल्यानंतर चूकीची नोंद अथवा कर आकारणी झालेली असल्यास कर आकारणी आणि संकलन विभागाकडे 20 डिसेंबर ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजे पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कर आकारणी विभागात तक्रार करता येणार आहे. तर प्रत्येक मिळकतीसाठी स्वतंत्र तक्रार अर्ज करणे आवश्यक असण्यासह मिळकतीच्या मालकानेच तक्रार करणे बंधनकारक असणार असल्याचे अजित देशमुख यांनी स्पष्ट केले.

