वरुणराजाचा कोप- .हाहाकाराची काळरात्र..नाल्याकाठच्या अधिकृत- अनाधिकृत बांधकामांची ,रहिवाश्यांची मोठी हानी

Date:

पुणे- बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडाला. ढगफुटी होऊन झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. जनजीवन विस्कळीत झाले. तर वेगवेगळ्या भागातून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते  आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता असून एक मृतदेह सिंहगड येथील कॅनॉल जवळील एका चारचाकीतून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांचे बचाव कार्य सुरू आहे.
कात्रज, धनकवडी, तळजाई परिसरात रात्री प्रचंड पाऊस झाल्यामुळे कात्रजच्या धरणातून  आंबिल ओढ्यातील पाणी लेक टाउन सोसायटी,के के मार्केट,गुरुराज सोसायटी  पद्मावती परिसरातून ट्रेझर पार्क , टाँगेवाला सोसायटी ते स्वारगेट, मित्रमंडळ चौकापर्यंत पुर्णपणे रस्त्यावर आल्यामुळे बहुतांश सोसायट्यामधील पार्किंग पाण्याखाली बुडाले. ट्रेझर पार्क येथे अंबिल ओढ्यातील पाणी उसळी मारून रस्त्यावर आल्याने हाहाकार उडाल्याचे नागरिकांनी सांगितले. केवळ अनधिकृत बांधकामणांच नाही तर नाल्याच्या लगत च्या अधिकृत वसाहतीत पाणी शिरून पाण्याने आपली जलरेषा दाखवून दिली.
https://youtu.be/M-gisvRQVpQ
पुण्यात पावसाने उडवलेल्या हाहाकारात नांदेड सिटी येथे राहणारी एक महिला दुचाकीसह वाहून गेली आहे. नांदेड सिटीमध्ये राहणार्‍या अमृता आनंद सुदामे या धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जाताना, पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
महापालिकेचे ठेकेदार असलेले किशोर गिरमे यांची कार पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. इतरही काही जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गिरमे हे नांदेड सिटीमध्ये राहायला होते. ते घरी जात असताना ही घटना घडली. 
अरण्येश्वर मंदिरात घुसले पाणी

सिंहगड रस्ता
ढगफुटीनंतर पुण्यातील 
या काही ठळक घटना !
* शहरातील सर्वच ओढे-नाल्यांना महापूर!
* रस्ते जलमय, घरांमध्ये घुसले पाणी!
*अतिवृष्टीबाधितांना हलवले सुरक्षित स्थळी
* पुणे शहरातील शाळांना आज सुट्टी जाहीर
*वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल
* ठीकठिकाणी कंपाउंड वॉल कोसळल्याने सोसायट्यांमध्ये पाणी
* पाण्याच्या लोंढ्यामुळे तब्बल १ हजार चारचाकी आणि २ हजार दुचाक्या वाहून गेल्या.
* पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने पुणे शहराला पुढील पाच दिवस अपुरा पाणीपुरवठा!
*आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे अरण्येश्वर येथील टांगेवाला कॉलनीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता असून एनडीआरएफच्या पथकांकडून शोधमोहीम सुरू
* खेड-शिवापूर परिसरात मुसळधार पावसात ५ जण गेले वाहून…तिघांचे मृतदेह सापडले.दोघांचा शोध सुरू.ग्रामीण पोलिसांची माहिती.
 आणि वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे बचपुणे : पुण्यात बुधवारी झालेल्या प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच मृतदेह मिळून आले असून, अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफच्या तीन पथकांकडून सुरू होते.
*कात्रज, आंबेगाव तसेच सिंहगड रोड परिसरातील ओढे नाले ओव्हरफ्लो होऊन त्यांचं पाणी वस्त्यांमध्ये शिरलं. अनेक सोसायट्या तसेच झोपडपट्टी भागांत पाणी शिरलं. रस्ते पाण्याखाली जाऊन त्यांना ओढ्याचं स्वरुप आलं.
* पुण्यात गल्लोगली, इमारतींच्या पार्किंगमध्ये जिथे जागा मिळेल तिथे रात्री दुचाकी चारचाकी पार्क केलेल्या असतात. ढगफुटीसदृष पावसाने पुण्यात हाहाकार उडवून दिला. रस्त्यांना, गल्ल्यांना दुथडी वाहणाऱ्या नद्याचं स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्या अक्षरशः वाहून गेल्या. सोसायट्यांमध्ये सकाळी गाड्य़ा पावसामुळे एकमेकांवर चढल्याचं दृष्य होतं. शेकडो वाहनं पावसाच्या पाण्याने वाहून गेली. शेकडो वाहनं नादुरूस्त झाली आहेत. विविध ठिकाणी अडकून पडलेल्या गाड्या बाहेर काढणं हे आता प्रशासनासमोर आणि नागरिकांसमोर आव्हान आहे.
*पुण्यातल्या ट्रेझर पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलय. सुमारे ७०० गाड्या पाण्याखाली अडकल्या आहेत.
*पाण्याचा प्रवाह एवढा होता की गाड्या ढकलल्या जात नव्हत्या. गल्ली बोळातून आणि अंतर्गत रस्त्यांवरूनही खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं.
*पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. रात्री ८ ते ११ या तीन तासात ११२ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या पर्जन्यमानानं २४ तासाच्या काळात शंभरी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती.
पुणे सातारा महामार्गावरील नविन कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. रस्त्यावर पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे त्यावर वाहनं न नेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. बिबवेवाडी महेश सोसायटी चौकात नदीला पूर आल्याप्रमाणे पाणी उसळत होतं.
– जांभूळवाडी नवीन बोगद्यातून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक दरीपूल परिसरात थांबविली.
– आंबिल ओढ्याला पूर.
– बालाजीनगर भागातील रजनी कॉर्नरच्या ओढापूलापासून काशिनाथ पाटील ओढापूलादरम्यान 50 हून अधिक घरांमध्ये पाणी
– कात्रज घाटातील तटावरून धबधब्यासारखे पाणी वाहू लागले.
– पीएमटीच्या मार्केटयार्ड डेपोची संरक्षक भिंत कोसळली.
– कात्रज येथील लेकटाऊन सोसायटी परिसर जलमय; दोन जण वाहून गेल्याची शक्‍यता?
– आंबेगाव खुर्दमधील शनिनगरच्या धोकादायक उतारावर पावसाच्या पाण्याचा हाहाकार.
– दांडेकर पूल झोपडपट्टीमधून आंबिल ओढ्यातून आलेले पाणी घरांमध्ये शिरले. पोलिस पाण्यात उतरून नागरिकांना बाहेर काढत होते
– नांदेड येथील गोसावी वस्ती रस्त्यावर तीन-चार फूट पाणी. वाहतुकीसाठी रस्ता बंद.
– कात्रज येथील किमया सोसायटी परिसरातील वसाहतीत पाणी.
– वारजे परिसरात वनखात्याच्या भिंतीला भगदाड पडल्याने मुख्य रस्ता जलमय.
– धनकवडी येथील सदगुरू पार्कच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी.
– कोल्हेवाडीतील मधुबन सोसायटी, आंबेनशोरा सोसायटी आणि झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पाणी. दोन्ही सोसायट्यांचा पहिला मजला पाण्याखाली. काही रहिवासी अडकून पडले.
– सहकारनगर परिसरातील तावरे कॉलनी, अरण्येश्‍वर, अण्णा भाऊ साठे नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...