पावसाने धो धो धुतले…पुण्याला

Date:

आज पुणे शहर आणि परिसराला पावसाने धो धो धुतले, बहुतेक रस्त्यांना नद्या नाल्यांचे स्वरूप आले होते.अनेक कार्यकर्ते याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियातून प्रसारित करत होते .पुण्याच्या प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

रात्री, आठपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही वेळात मध्यवस्तीतील अनेक सोसायट्यांत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. तसेच, उपनगरातील हॉटेल, सोसायट्यांमध्येही पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे काही भागात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कात्रज भागात 142 मिमी पावसाची नोंद झाली. तर खडकवासला – 108 मिमी, वारजे – 63, कोथरूड – 67 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कात्रजमध्ये मागील 10 वर्षांतील एका दिवसात पडलेल्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील दांडेकर पुलालगतच्या वस्तीमधील नागरिकांना सानेगुरुजी शाळा व मनपा कॉलनी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

पुणेकरांसाठी रात्र भयाची…
रात्री कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची अक्षरशः झोप उडाली. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना मागील वर्षीच्या त्या काळ्या रात्रीची आठवण झाली. पावसाच्या भीतीने अनेक पुणेकरांनी रात्र जागवून काढली.

दरम्यान नीमगांव केतकी गावातील पुराच्या वेढ्यात ५५ जण अडकले असून त्यातील ४० जणांना सुखरूपपणे बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे तर १५ जण अजूनही अडकून पडले आहेत. इंदापूरजवळ दोन जण वाहनासह वाहून गेले मात्र वेळीच मदत मिळाल्याने ते बचावले आहेत.

आंबील ओढा परिसरात पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाची पथके सज्ज मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ओढ्याच्या लगत असणाऱ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरले.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यात दुपारपासून जोरदार पडत असलेल्या पावसाचे पाणी, देवा फुड मॉलसमोर रस्त्यावरून वाहू लागले आहे.सध्या पावसाचा जोर कायम असल्याने, पुढील काळात रस्त्यावर आणखी पाणी येण्याची शक्यता आहे. यामुळे इंदापूर ते भिगवण या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावरील पाणी ओसरल्याशिवाय वाहतूक चालू करण्यात येणार नसल्याने, या मार्गावर पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवासासाठी येऊ नये, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी केले आहे.पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज क्रमांक दोन या ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गावर आलेले पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर, वाहतूक सुरू करण्याबाबत विचारविनिमय केला जाणार असल्याची माहिती जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...