Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कसबा जर आहे आमचा बालेकिल्ला ..तर …?

Date:

पुणे-पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची कारकीर्द वादग्रस्त मार्गावर असतांनाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेची उमेदवारी त्यांनाच का बहाल केली ,त्यांच्यावर एवढी कृपादृष्टी का ठेवली ? असा सवाल भाजपच्या जुन्याजाणत्या ज्येष्ठआणि अगदी नव्याने भाजपमध्ये सक्रीय झालेल्या आशावादी अशा युवा कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्ष शिस्त ,बंड अशा भीतीने उघड कोणी बोलत नसले तरी भाजपमधील हि चर्चा चव्हाट्यावर मात्र पोहोचली आहे. कसबा विधानसभा मतदार संघ जरूर भाजपचा बालेकिल्ला आहे. मग इथे हेमंत रासने ,धीरज घाटे यांना उमेदवारी दिली असती तर ते निवडून आले नसते काय ? सुहास कुलकर्णी ,योगेश गोगावले सारखी  जुनी संघर्षाच्या काळात भाजपसाठी लढलेली माणसे होती , त्यांना उमेदवारी दिली असती तर भाजपच्या बालेकिल्याचे बुरुज ढासळलेअसते काय ? माणसे जुनी झाली हाच दोष त्यांचा ,नवीन माणसाना उमेदवारी द्यावी हे हि धोरण इथे राबवावे असे वाटल्याचे  दिसलेले  नाही. जो मतदार संघ गेली 25 वर्षे भाजपच्या गिरीश बापटांच्या पाठीशी राहत आला .त्या मतदार संघाबाबत मुख्यमंत्र्यांना चिंता वाटली कि काय ? तब्बल अडीच वर्षे महापौर पदावर असताना त्यांना उमेदवारी देण्यामागचे नेमके कारण काय ?   का एवढी त्यांच्यावर कृपा दृष्टी ?  असा भाजपच्या गोटातून होणारा सवाल आता हळू हळू धुके निवळावे तसा निवळत जाईल कारण त्याचे  उत्तर आता मिळणार नाही हे कार्यकर्त्यांना  ठाऊक झालेले आहे . पण आता हाथी झेंडा घ्यायचा आणि धूम ठोकायची ..बालेकिल्ला राखा, म्हणायचे बस एवढेच कार्यकर्त्यांच्या हाथी उरलेय ….
पुण्याच्या केसरीवाड्यातील टिळकांच्या घरातील एक जन भाजप मध्ये तर एक जण कट्टर काँग्रेसी ,म्हणजेच दोन्ही डगरींवर यांचा हाथ असल्याचे नेहमी दिसून आले आहे. स्वर्गीय जयंतराव टिळक हे कॉंग्रेसचे नेते होते . शहरात त्यांचे प्राबल्य होते तसेच दिल्लीदरबारी त्यांचे वजन होते . तेव्हा स्वर्गीय बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा एक गट जो स्वर्गीय प्रकाश ढेरे चालवीत आणि टिळकांचा गट अजीत आपटे चालवीत या दोन्ही गटांचे शहरात वर्चस्व होते.त्यांच्या काळात ना कोणाला उंच कॉन्क्रीट च्या इमारती उभारण्याची हौस होती , ना महापालिकेच्या हद्दी वाढविण्याची हौस होती ,शांत ,निसर्गरम्य पुणे शहर त्यांच्या कारकिर्दीत पुणेकरांनी अनुभवलेले . तरीही जयंतराव टिळक नगर सहकारनगर मध्ये वसविले गेले तेव्हा त्यांच्याच पक्षातून त्यांना स्पष्ट विरोध झाला होता ,सुरेश कलमाडी आले आणि मग  शहराच्या विकासाच्या गप्पा  काँक्रीटीकरन वाढत शहर अजगराचे रूप धारण करीत गेले .पेशवे उद्यान बाहेर हलवून कात्रजच्या धरणालगत चे जंगल नामशेष करण्यात आले. अर्थात कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या काळात जरी हे सारे झालेले असले तरी तेव्हाही विरोधी पक्ष होताच आणि टिळकांच्या नंतर कॉंग्रेस मध्ये रोहित टिळक आणि भाजपमध्ये मुक्ता टिळक अशी दोन दोन नेते दिसत आली .सत्ता कोणाची असली तरी टिळक घराण्यातील एकाचे तिथे प्राबल्य जरूर राहिले.भाजपमध्ये नगरसेविका पदावरून मुक्ता टिळकांनी आपली विरोधी पक्षातील सदस्याची जबाबदारी जरूर सांभाळली पण शहराच्या अजगररुपी अकरा ळ विक्राळ स्वरूपाला मर्यादा घालून जुन्या पुण्याच वैभव ,निसर्ग संपदा जपण्याचा त्यांनी खूप आटोकाट अंताचा  प्रयत्न केलाय असे  कुठे दिसून आले नाही .कलमाडी गेले ,दादा आले पुढे कॉंग्रेसची सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली ,झाले काय ? फरक काय पडला ? काही नाही ?फरक एक पडला महापौर पदाला एक वर्षाचा अवधी अगोदरचे पक्ष देत होते तो मुक्ता टिळक यांना तब्बल अडीच वर्षांचा मिळाला .सर्वाधिक काळ महापौर पदावर राज्य करण्याची संधी मिळाली ,ज्या अजूनही त्याच पदावर आहेत, या कारकिर्दीत त्यांनी काय केले ? त्याची असंख्य कामे ते जरूर सांगतील . पण या सर्व  कामांचा पाया  कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या काळातच घातला गेला होता ,ती  प्रलंबित  कामे होती ,रखडलेली कामे होती … असे सांगण्यात येतेच आहे. असेलही तसे आणि यांनी त्याच कामाना गती दिली ,याचा अर्थ ती कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पाया घातली गेलेली कामे चांगलीच होती हे हि मान्य करावे लागेल .नवीन कुठला प्रकल्प शहरात आणण्यात आला हा प्रश्न निश्चित विचारला जातोय ,वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाण पुले  हे प्रकल्प मानावेत काय ? मानले तर त्यांनीही वाहतूक समस्या सुटेल काय ? सुटली काय असेही मुद्दे येतातच पण  या सर्व सकारात्मक बाबिंपेक्षाही महापौर चर्चेत राहिल्या त्या वादग्रस्त बाबींनी ….
त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभीच ‘ माय मराठी ‘ ने महापालिकेच्या मुख्य इमारतीत अधिकारी ,कर्मचारी यांच्या खुर्चीत बसून काम करणारे शंभरावर लोक हे महापालिकेचे नौकरच नाहीत आणि ते ठेकेदारी पद्धतीने देखील कामाला नाहीत म्हणजेच कोणतीही अधिकृत ओळखपत्र ,अपौइंटमेंट लेटर  नसताना हे लोक तिथे काम करीत आहेत याचा गौप्यस्फोट केला. तो खोटा नाही तर खराच आहे हे दाखविण्यासाठी ओंन कॅमेरा एकाला मिळकत कर विभागात रंगे हाथ पकडून दिले .त्याला प्रशासनाने तिथून हुसकावून दिले आणि त्याच्यावर चालढकल करत दुसऱ्या  दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भूमी जिंदगी खात्यात सतीश कुलकर्णी, अनिल मुळे  नावाचे अधिकारी यांच्या अखत्यारीतील कार्यालयात आणखी एक बोगस कर्मचारी ‘मायमराठी ‘ने पकडून दिला .पण कुलकर्णी आणि मुळे यांनी हे प्रकरण  नावाचे पुढे सोयीस्कर पणे हे प्रकरन  आपल्या पद्धतीने दाबून टाकले .आणि पुढे बोगस कर्मचारी विषयाबाबत दुर्लक्षित धोरण कायम आजतागायत राबविले . महापौरांनी याबाबत चकार शब्द हि कुठे उच्चारला नाही, त्यावर कोणाला धारेवर धरले नाही आणि काही माहिती नाही, काही घडलेच नाही  असे दर्शवित आपली दिनचर्या सुरूच ठेवली .महापालिकेत तरुणांना कामावर लावण्याच्या आमिषाने वेठबिगाराप्रमाणे अत्यंत अल्प म्हणजे ६ ते ७ हजार रुपये वेतनात राबवून घेण्यात येते आहे याकडे सातत्याने दुर्लक्ष तर केले पण असंख्य जागा रिकाम्या असताना त्या रीतसर मार्गाने भरण्याचा प्रयत्न कधी त्यांनी केल्याचे दिसले नाही .दीप्ती चौधरी यांनी आपल्या महापौर पाच्या कारकिर्दीत महापौर बंगला, तेव्हा त्यांना विरोध झाला होता . पण त्यानंतर हा  बंगला महापालिकेच्या अधिकारी,नगरसेवक यांच्या असंख्य बैठका ना वापरला गेला .पण तो कोणत्याही म्हणजे महापौर ज्या पक्षाच्या त्याच पक्षाच्या वैयक्तीक पक्षसंघटना पातळीवरील बैठकांसाठी वापरला गेला नाही ,राजकीय खलबते करण्यासाठी वापरला गेला नाही . तो या महापौरांच्या कारकिर्दीत सातत्याने पक्षाच्या मिटींगा घेण्यासाठी वापरला गेला .जवळ जवळ  भाजपच्या कार्यालयाचे स्वरूप महापौर बंगल्याला आले.
सर्वात कडी म्हणजे यांच्या कारकिर्दीत अनेक विकास कामांचे टेंडर शेकडो कोटींनी फुगवून आले आणि मंजूरही केले पण त्यांचा भांडाफोड खुद्द महापौरांनी कधी केला नाही ,अशा गैरप्रकारांचा भांड फोड  मिडिया आणि विरोधी पक्षनेत्यांनी केल्यावर खुद्द मुख्यमंत्री कार्यालयावर   हि वादग्रस्त बनलेली टेंडर प्रक्रिया आणि त्याबाबत महापलिका समित्या सभेने बहुमताने घेतलेले  निर्णय रद्दबातल ठरवीत टेंडर पुन्हा काढावीत म्हणून आदेश देण्याची नामुष्की आली .आणि पुन्हा  टेंडर प्रक्रिया सुरु केल्यावर महापालिकेचे किती कोट्यावधी रुपये लुबाडले जावू पाहत होते हे देखील सिद्ध झाले .
कसबा विधानसभा मतदार संघ जरूर भाजपचा बालेकिल्ला आहे. मग इथे हेमंत रासने ,धीरज घाटे यांना उमेदवारी दिली असती तर ते निवडून आले नसते काय ? सुहास कुलकर्णी ,योगेश गोगावले सारखी  जुनी संघर्षाच्या काळात भाजपसाठी लढलेली माणसे होती , त्यांना उमेदवारी दिली असती तर भाजपच्या बालेकिल्याचे बुरुज ढासळलेअसते काय ? माणसे जुनी झाली हाच दोष त्यांचा ,नवीन माणसाना उमेदवारी द्यावी हे हि धोरण इथे राबवावे असे वाटल्याचे  दिसलेले  नाही. जो मतदार संघ गेली 25 वर्षे भाजपच्या गिरीश बापटांना निवडून देत आला .त्या मतदार संघाबाबत मुख्यमंत्र्यांना चिंता वाटली कि काय ? अडीच वर्षे महापौर पदावर असताना त्यांना उमेदवारी देण्यामागचे नेमके कारण काय ?   का एवढी त्यांच्यावर कृपा दृष्टी ?  असा सवाल केला जातोय ,ज्याचे उत्तर आता मिळणार नाही हे साऱ्यांना  ठाऊक झालेले आहे . आता हाथी झेंडा घ्यायचा आणि धूम ठोकायची ..बालेकिल्ला राखा म्हणायचे बस एवढेच कार्यकर्त्यांच्या हाथी उरलेय ….
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...