पुण्यातून शिवसेनेला शिवाजीनगर आणि हडपसर मतदारसंघ …?

Date:

पुणे  – विधानसभेसाठी युती होणार, हे स्पष्ट असले तरी 8 पैकी कोणते मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेला सोडण्यात येणार यावर चर्चा रंगत असताना शिवाजीनगर आणि हडपसर हे दोन विधानसभा मतदार संघ सेनेला देण्यास मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे वृत्त आहे . यामुळे विद्यमान आमदार विजय काळे आणि योगेश टिळेकर यांचे राजकीय पुनर्वसन नेमके कसे होणार ? कि होणार नाही यावर देखील चर्चा होते आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युती आणि जागावाटपावर नुकतेच भाष्य केले. त्यावेळी त्यांनी ” निवडणुकीत युती होणार आहे. विद्यमान आमदारांचे मतदारसंघ बदलण्यात येणार नाहीत. उर्वरित मतदार संघ निम्मे वाटून घेण्यात येतील,’ असे स्पष्ट केले. हा फॉर्म्युला मान्य केला, तर पुण्यात सध्या आठही जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे सध्या शिवसेनेला संधी मिळेल, अशी शक्‍यता कमी आहे. तर, शहरातील प्रत्येक आमदार “विधानसभा मीच लढविणार’ असे स्पष्ट सांगत आहे.असे असले तरी सर्वाधिक टांगती तलवार विजय काळे आणि योगेश टिळेकर यांच्यावर असल्याचे त्यांनाही ठाऊक असल्याचा दावा देखील केला जातोय . याच अनुषंगाने शिवाजीनगर आणि हड़पसर येथून शिवसेनेच्या इछुकांनी काम सुरु केल्याचे सांगण्यात येते आहे,.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...