पुणे-“ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.”असे ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी दवे यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षित रहाण्याचा सल्ला दिलाय. यानंतर दवे यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैंगबर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जगभरात निर्देशने झाली. अखेर पक्षाने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली. मात्र, त्यानंतर अल्पसंख्याक मूलतत्ववादी संघटनेच्या सदस्यांकडून राजस्थानमधील उदयपूर आणि महाराष्ट्रातील अमरावती येथे गळा चिरून निर्घृण खून केल्याच्या घटना घडल्या . त्यापार्श्वभूमीवर अशा घटना अन्य इतरत्र कुठेही घटना घडू नये यासाठी तपास यंत्रणा सावध झाल्या आहेत.

