पुणे : एका जागेवर बराच अवधी उभे राहून हलण्याचे नाव न घेणाऱ्या,आणि डीजे चा दणणाट न थांबविणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पुण्याचे शांत म्हणून समजले जाणारे पोलीस आयुक्त संतापले आणि त्यांना दरडावले विशेष म्हणजे यावेळी पुरुष कार्यकर्ते शांत झाल्याचे दिसले परंतु एक महिला कार्यकर्ती मात्र त्यांच्या संतापावर हसताना दिसत होती.काळ सकाळी सात वाजताच पोलीस आयुक्त विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर आले ते सातत्याने मंडई तेअलका चौक या मार्गावर स्वतः फिरत कुठे उभे राहून पुण्याच्या मिरवणुकी वर लक्ष ठेऊन होते.त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतल्याचे स्पष्ट दिसून आले.
पुण्यात २२ तास उलटल्यानंतरही अद्याप गणपती विसर्जन मिरवणूक सुरु आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान शुक्रवारी रात्री विसर्जन मिरवणुकीमध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळाला.यावेळी नेहमी हसतमुख असणारे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता माजी नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले त्यांचे मंडळ कुमठेकर रस्त्यावरून बराच काळ जागेवरून हलले नाही. त्यामुळे दोन तास पाठीमागील मंडळे पुढे जाऊ शकली नाहीत. पाठीमागील मंडळांनी आणि पोलिस प्रशासनाने वारंवार विनंती करूनही मंडळ ऐकत नव्हते. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्त गुप्ता मंडळाचा डी. जे. बंद करण्यासाठी गेले.
पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक २४ तासांनंतरही रेंगाळल्यामुळे विसर्जनास उशीर झाला आहे. पोलीस प्रशासन आणि मंडळामध्ये समन्वयाचा अभावामुळे मिरवणूक लांबल्याचा चुकीचा प्रचार सुरु झाला आहे.मानाच्या ५ गणपती मंडळांनी घेतलेला लक्ष्मी रस्त्याचा अवधी पाहता तो अन्य मंडळांना मानवणारा ठरला नाहीच.पण एकीकडे न्यायालयाचा निर्णय,दुसरीकडे मुक्यामंत्री एकनाथ शिंदे… यांची..यंदा गणपती जोरात…ची दिलेली हाक या सर्व पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांना स्फुरण चढले तर पोलिसांचे मात्र प्रेशर वाढले,ते वाढू नये यासाठी कार्यकर्त्यांशी हसत खेळत मिळून मिसळत मिरवणूक पुढे न्या असाच जणू सल्ला आयुक्तांनी दिला होता.आयुक्तांच्या या चांगल्या वागणुकीला कुठे प्रतिसाद मिळाला तर तर कुठे त्यांचा फायदा घेतला गेला आणि मिरवणुकीला उशीर झाला,सकाळी या घटनेनंतर मात्र मंडळे हलायला सुरुवात झाली आणि मिरवणुकीने वेग घेतला.