पुणे- एकीकडे अट्टाहास करून चौकाचौकात पोलीस शिपाई उभे करून त्यांना वसुलीचे टार्गेट देणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आता लगाम घालण्याची वेळ आली आहे .वाहतूक नियमन तर हे करत नाहीच ,नाही वाहतुकीची कोंडी सोडवीत मात्र सामान्य दुचाकीस्वारांना पळून चालेलला गुन्हेगार समजून ..धावत जाऊन पकडा ,अरेरावी करा आणि त्याच्याकडून वसुली करा अशी हेल्मेट गिरी चालविलेल्या या पोलीस आयुक्तांना लगाम घालून .. आता पुरे झाली …हेल्मेटगिरी ..जरा पहा वाढतेय गुन्हेगारी …असे सुनावण्याची वेळ आली आहे. हेल्मेट वापरूनच पुण्यात गुन्हेगार चेहरा लपवून मोकाट फिरत असावेत याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची वेळ आली आहे .तर दुसरीकडे जे आमदार, खासदार आणि नगरसेवक मौन पाळून हेल्मेट सक्तीच्या विरोधात रस्त्यावर येत नाहीत त्यांना पुणेकरांनी ‘व्यवस्थित ध्यानात’ ठेवण्याची देखील वेळ येवून ठेपली आहे.
नागपुरातून खास जणू मुख्यमंत्र्यांनीच सोशिक आणि नेतृत्व हरवलेल्या पुणेकरांकडून वसुलीसाठी पाठविलेल्या, यासांस्कृतिक शहरात मागील २० दिवसांत १२ पेक्षा जास्त खून झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्याआहेत .रात्रीच्या वेळी लुटमार प्रकार हि वाढते आहेत .हे धक्कादायक आहे. सार्वजनिक ठिकाणी खून आणि हल्ले झाले आहेत, .एकीकडे अशा घटना आणि दुसरीकडे पोलिसांकडून होणारी वसुली अशा कचाट्यात सोशिक पुणेकर सापडला आहे .नागरिकांमध्ये भीतीआणि दहशत निर्माण झाली आहे.पुणे नेहमीच शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते आणि अशा ठिकाणी ह्या घटना घडणेम्हणजे शहराच्या प्रतिमेस कलंक लावणारे आहे.पुण्याचे पालकमंत्री आणि खासदार ..मुख्यमंत्र्यांच्या या पोलिसी अवतारापुढे मान तुकवून शेपूट हलवीत निमूटपणे पडून आहेत .एकीकडे उच्च वर्गात शिक्षित आणि प्रतिष्ठेचा टेंभा मिरविणाऱ्या विरोधीपाक्षाच्या महिला खासदारांनी देखील पोलिसांच्याकडून हेल्मेटगिरी च्या नावाने होणाऱ्या लुट्मारीला विरोध न करण्याचीच भीष्मप्रतिज्ञा केली आहे. सुर्यकांत पाठकांसारखे ग्राहक चळवळीतील प्रभावी नेते वैयक्तिक शाररीक व्याधी आणि राजकारण यामुळे प्रभावहीन ठरू लागले आहेत. .
संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेली ,सोशिक जनता ५०० रुपये खर्च करून ससेमिरा चुकवू पाहत असली तरी वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीची भीती यातून सुटका करवून घेवू शकलेली नाही . दुटप्पी भूमिका घेणारे राजकीय पक्ष ,आणि सत्ताधाऱ्यांची गुलामी करणारे अधिकारी या चक्रात पुणेकरांची अडकलेली मान सोडून काढायला ..पुणेकरांचे नेतृत्व करू पाहणारे ..कोण कोणते भावी खासदार,आमदार उद्याच्या हेल्मेट सक्ती विरोधातील आंदोलनात सहभागी होताहेत हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे . उद्या जे आमदार ,खासदार या आंदोलनात सहभागी होणार नाहीत ..त्यांना मात्र धडा शिकवायला ..सोशिक पुणेकरांनी तयार राहायला हवेच एवढे मात्र निश्चित ….