पुणे पोलीस, ग्रामीण व लोहमार्ग पोलीस दल तसेच कारागृहातील 13 अधिकारी व कर्मचा-यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
पदक जाहीर झालेल्या पोलिसांची नावे व पद
बाळशीराम गणपथ गायकर (पोलीस उपायुक्त, मुख्यालय एक, पुणे शहर), विवेक वसंत मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी), कैलास शंकर मोहोळ (सहाय्यक फौजदार, सिंहगड पोलीस ठाणे), राजकुमार दौलत माने (सहाय्यक फौजदार, मोटार परिवहन विभाग, पुणे शहर), सुरेश रामचंद्र जगताप (सहाय्यक फौजदार, वाहतूक शाखा), चंद्रकांत किसन रघतवान (सहाय्यक फौजदार, वारजे पोलीस ठाणे), प्रकाश केशव लंघे (पोलीस हवालदार, कोरेगाव पार्क), पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्जेराव बाजीराव पाटील (पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे), राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक व दोनमधील प्रकाश पांडुरंग नाईक (सहाय्यक फौजदार गट क्रमांक 1) व सदशिव प्रभु शिंदे (सहाय्यक फौजदार गट क्रमांक 2)
तर येरवडा खुले जिल्हा कारागृहात कार्यरत तुरुंग अधिकारी प्रकाश बाबुराव उकरंडे व कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस हवालदार रमेश परशुराम धुमाळ यांना महाराष्ट्र कारागृह विभागातील गुणवत्ता सेवेबाबतचे सुधारसेवा पदक जाहीर झाले आहे.