
पुणे – गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा म्हणून शहर पोलिसांनी सर्वत्र सतर्कतेचे धोरण अंगिकारले असून नागरिक आणि भाविक यांना विनाकारण त्रास देण्याएवजी त्यांची मते , प्रवाह समजून घेवून काम करा आणि प्रामुख्याने सामाजकंटकांवर लक्ष ठेवा हा पोलीस आयुक्तांचा संदेश अंमलात आणला जातो आहे
दरम्यान पोलिसांनी ६ टोळयांच्या ४१ जणांसह एकूण १०० जणांवर हद्दपारीची कारवाई केली. उत्सव चालू झाल्यापासून शहरातील ३९३ ठिकाणांची बॉम्ब शोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाकडून तपासणी केली आहे आगामी काळात देखील बीडीडीएसकडून तपासणी चालू राहणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
शहरात अनुचित घटना घडू नये म्हणून शीघ्र कृती दलाकडून ७ तर एनएसजीकडून वेगवेगळया ठिकाणी २ ड्रील घेण्यात आले आहेत. आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त सुनिल रामानंद यांनी चालू वर्षात एमपीडीए अंतर्गत ११ सराईत गुन्हेगारांना राज्यातील विविध कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले आहे. ऑगस्ट २०१६ अखेर ६ गुन्ह्यांतील ५० सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

