पुणे- पिछे पिछे आपकी बात चले, तो घबराना मत,
बात तो उन्हीकी होती है, जीनमे कोई बात होती है…
अशी शेरोशायरी करत विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत आयोजित एक शाम मोहब्बत के नाम या मुशायरा कार्यक्रमात कलाकारांसमवेत सक्रीय सहभाग नोंदवीत वाहव्वा मिळविली
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एक शाम मोहब्बत के नाम या कार्यक्रमात देशाच्या विविध भागातून आलेल्या कवी व रचनाकारांनी सहभाग घेतला. त्यांनी हिंदी आणि उर्दूतून सामाजिक, राजकीय, क्षेत्रावर तसेच विनोदी, विडंबनात्मक रचना सादर केल्या. त्यांच्या या रचनांना दाद देत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माणिक ठाकरे यांनी शायरी करीत रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र कॉस्मोपोलीटीन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, पुणे शहरात सामाजिक, कला, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये नाव पुढे येत असेल तर ते आबा बागुल यांचे आहे. राजकीय माणसे ही फक्त राजकारण करतात. मात्र, राजकारणाबरोबरच विविध क्षेत्रात काम करणारे आबा बागुल यांनी कॉंग्रेस पक्षाचा एक हिरा म्हणून त्यांनी नावलौकिक व लोकांचे प्रेम मिळवले आहे. दिवसागणिक वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
पी.ए. इनामदार म्हणाले, आबा बागुल हे नेहेमी काहीतरी नवीन करण्यासाठी बेचैन असतात. त्यांचा सर्व प्रकारच्या लोकांशी, सर्व पदांवरच्या लोकांशी संपर्क आहे. अडचणीच्या वेळी धावून जाण्याची त्यांची प्रवृत्ती वाखाणण्याजोगी आहे. देशात जे काही चांगले असेल ते आपल्या शहरात आणण्याचा त्यांचा ध्यास असतो.
त्यांचे सर्व क्षेत्रांत काम आहेच परंतु त्यांनी शिक्षण क्षेत्रातही इ- लर्निग स्कूलच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. त्यांची आणि माझी त्यासाठी स्पर्धा असते.
आजकाल टेलेव्हिजनवर ज्याप्रकारे नृत्य, गाणी, नाटके चालतात ते पाहिल्यानंतर भारताची संस्कृती जपण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम नवरात्रौ महोत्सवाच्या मंचावर होतात ही विशेष बाब असल्याचे ते म्हणाले.
पुन्हा एकदा पुण्याच्या संस्कृतीशी जोडण्याचे काम पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या माध्यमातून केले जात आहे असेही त्यांनी नमूद केले.
या मुशायरा या कार्यक्रमात डॉ. पॉप्युलर मेरठी, डॉ. सागर त्रिपाठी, डॉ. मेहताबआलम, केतन शर्मा, निलोमेघ नीलम, शेख निझामी, शाएस्ता सना, नम्रता श्रीवास्तव, डॉ. भुवन मोहनी यांनी विविध रचना सादर केल्या. प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मोठी मेणबत्ती पेटवून कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते सर्व कवींचा सत्कार करण्यात आला.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घन:श्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे,अमित बागुल, रमेश भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.

