पुणे-19व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात आज शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदीरात
हजारो भावीक महिलांनी एकत्रित महाआरती करून सारे वातावरण भक्तीमय केले. पुणे नवरात्रौ
महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या पुढाकाराने झालेल्या या महाआरती
कार्यक्रमात राज्याचे मंत्री श्री गिरीष बापट यांच्या पत्नी सौ. गिरीजा गिरीष बापट या देखील
सहभागी झाल्या होत्या.
पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी सोबत आरतीची थाळी आणली
होती. यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना जयश्री बागुल म्हणाल्या की, नवरात्रामध्ये झालेल्या
महिला महोत्सवामुळे सहभागी महिलांना नवीन उर्जा मिळते, स्वतःची ओळख पटते,
धार्मिकतेबरोबरच सामाजिक दृष्टी देखील विकसित होते. ही बाब खूप चांगली आहे असे सांगून
या महिला महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व महिलांना त्यांनी धन्यवाद दिले. दीपा बागुल यांनी
आभार प्रदर्शन केले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी सौ व श्री काटेकर, दत्तवाडी पोलिस ठाण्याचे
निरीक्षक देवीदास घेवारे व त्यांच्या पत्नी, नगरसेवीका लता राजगुरू, सुजाता शेट्टी हे मान्यवर
उपस्थित होते. यावेळी 12 राशींवर आधारित ‘राशीगीत’ हा रंगतदार कार्यक्रम श्रीमती करंदीकर व
त्यांच्या सून आश्विनी करंदीकर यांनी सादर केला. यावेळी भाग्यलक्ष्मी लकी ड्रॉ ही काढण्यात
आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक वंदना नवले (वॉशिंग मशीन), द्वितीय क्रमांक शांताबाई पठारे
(पैठणी) आणि तृतीय क्रमांक शुभांगी साकरे (इंडक्शन) तसेच 10 उत्तेजणार्थ बक्षीसे देण्यात आली.
उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेट देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रेखा
झानपुरे, नर्मता गौड, विद्युलता साळी, वृशाली बागुल, श्रृतीका बागुल आणि नुपूर बागुल यांनी
विशेष प्रयत्न केले.