माजी महिला महापौरांच्या उपस्थितीत भक्ती -शक्तीचा जागर
पुणे नवरात्रौ महिला महोत्सव: महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत महाआरती
पुणे –महिलांच्या लक्षणीय गर्दीत आणि पुण्यनगरीच्या माजी महिला महापौरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. लक्ष्मी मातेची महाआरती करून भक्ती- शक्तीचा जागर करण्यात आला.
अष्टमीनिमित्त पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्यावतीने शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री. लक्ष्मीमाता मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, मा. आमदार कमल ढोले पाटील , दीप्ती चवधरी , रजनी त्रिभुवन, चंचला कोद्रे , तसेच सुनंदा गडाळे ,ज्योती अंकुश काकडे , भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई ,अभिनेत्री प्राजक्ता माळी,शुभांगी गायकवाड , जी. एम. केंजळे आणि महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल,उपाध्यक्षा निर्मला जगताप , माजी उपमहापौर व पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक आबा बागुल , अमित बागुल आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांसह उपस्थित महिलावर्गानी मनोभावे महाआरती केली. तत्पूर्वी आबा बागुल यांनी माजी महिला महापौरांचा राजकारणातील प्रवेश आणि महत्वाचे पद भूषविल्याबद्दल मुलाखतही घेतली. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दादही दिली. महाआरतीचे संयोजन हर्षदा बागुल , दीपा बागुल ,नम्रता जगताप , सोनम बागुल, नूपुर बागुल ,प्राजक्ता ढवळे यांनी केले.