पुणे- विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांना पुणे नवरात्रौ महोत्सवात यंदाच्या श्री लक्ष्मीमाता कलासंस्कृती जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
जेष्ठ अभिनेते पद्मश्री डॉ.मोहन आगाशे, जेष्ठ संपादक अनंत दीक्षित,लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, प्रसिध्द कवी व गीतकार जयंत भिडे आणि सामाजिक कार्याबद्दल संतोष शर्मा यांना श्री लक्ष्मीमाता कलासंस्कृती जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ११ हजार रुपये रोख,स्मृतीचिन्ह देवीची प्रतिमा,
शाल व श्रीफळ असे या पुरस्कारचे स्वरूप होते. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या या सोहळ्यास माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, माजी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर,नगरसेवक आबा बागुल, सौ.जयश्री बागुल आदी मान्यवर उपस्थित
होते.
यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर,नगरसेवक आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले.या मंचावर श्री लक्ष्मीमाता कलासंस्कृती जीवनगौरव पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांना अनेकांना पुढे अनेक पुरस्काराने
सन्मानित केले गेले. काहींना तर राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला.
सत्काराला उत्तर देताना डॉ.मोहन आगाशे म्हणाले, आबा बागुल यांचे शिक्षण क्षेत्रातील काम व वृद्धांसाठीचे काम स्पृहणीय आहे. त्याबद्दल त्यांनाच पुरस्कार देणे आवश्यक आहे. पूर्वीची लावणी, राजकारण, शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र यामध्ये खूब बदल झाला असून हा विचार करण्याचा मुद्दा आहे असे त्यांनी सांगितले.
अनंत दिक्षित म्हणाले, डॉ.मोहन आगाशे आणि लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांच्याबरोबर पुरस्कार मिळाल्यामुळे आयुष्यातील कृतार्थता वाटते. प्रत्येक सामान्य माणसाच्या मनगटाला जोपर्यंत घामाचा वास येतो तोपर्यंत धर्मसत्ता,राजसत्ता नाही तर समाज घडविण्याचे काम हा सामान्य माणूसच करेल. प्रज्ञा,प्रतिभा आणि विवेक यांचे सार्वजनिक स्वरूप दाखविण्याचा हा सोहळा आहे.
मंगला बनसोडे यांनीही आप् ले मनोगात व्यक्त केले. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या लावणी आणि तमाशाची कला लोप पावत चालली आहे.ती जोपासण्याचे काम मी करते आहे. त्यांनी ‘पोटासाठी नाचते मी, पर्वा कोणाची ही लावणी गायली.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह सर्वचा वक्त्यांनी या पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. समाजात चांगले काम करणाऱ्यांचा गौरव होत आहे, त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली जात आहे ही समाधानाची बाब आहे. हे पुरस्कार अनेकांना प्रेरणादायीच व मार्गदर्शक ठरतील असे म्हटले.
आभार घनश्याम सावंत यांनी मानले.