Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लॉक डाउन 4 , पुण्याची नियमावली वाचा-7 च्या आत सर्वच घरात….

Date:

पुणे – लॉकडाऊन ४ मधील पुणे महापालिका कार्यक्षेत्राकरिता नवीन सुधारित आदेश जारी करण्यात आले असून, संपूर्ण शहरात संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये ६५ वयोगटापेक्षा जास्त व १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्यावश्यक सेवा व आरोग्य विषयक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही. तर कंटेन्मेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्रात) केवळ औषध विक्रीची दुकाने, बाह्य रूग्ण सेवा व दवाखानेच सुरू राहणार असून, किराणा माल, भाजीपाला विक्रीस आता बंदी घालण्यात आली आहे.

पुण्यातील बाधित क्षेत्रांसाठी जीवनावश्य क वस्तुंच्या दुकानांसह या क्षेत्राबाहे रील   बहुतांशी व्यवहार बुधवारपासून (दि.20) सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, सर्व प्रकारची सावर्जनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे “पीएमपी’, कॅब, रिक्षांसह मॉल, मल्टीप्लेक्स्, हॉटेल, सलून बंद राहणार आहेत. बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांतील बॅंका, सरकारी कार्यालये, आयटी कंपन्या, बांधकाम सुरू होतील. विशेष म्हणजे, काही “रस्ते    वगळता बहुतांशी परिसरात पथारी व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, बाधित क्षेत्रात अत्यावश्य क सेवा वगळता अन्य घटकांना विशेषत: नागरिकांना रस्त्यांवर येण्यास बंदी आहे.

ज्या भागांतील सोसायट्या, व्यापारी संकुला कोरोनाचे रुग्ण आढळून येतील आणि ते प्रमाण वाढत गेल्या त्या जागा सील करून त्यांचा समावेश बाधित क्षेत्रात केला जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, दुकाने सुरू करताना संबंधित मालकांना आपल्याकडच्या कामगारांसह ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविली. त्याकडे काणाडोळा करणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईला तोंड द्यावे लागणार असल्याचेही बजाविण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वंभूमीवर चौथ्या टप्प्यातील म्हणजे येत्या 31 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार बाधित क्षेत्र वगळता बहुतांशी परिसरातील व्यवहार सुरू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी रात्री दिले आणि नवे आदेश लगेचच म्हणजे रात्री बारानंतर अमलात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या बाजारपेठा पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच, पथारी व्यावसायालाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, हडपसर-(सोलापूर रस्ता),पुणे-सातारा रस्ता, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, वाघोली, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता पथारी व्यावसायिकांना परवानगी नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नव्याने काही सवलती देताना जुन्या 69 बाधित क्षेत्रातील 24 भाग वगळण्यात आले आहेत. तर नवा भाग समाविष्ठ करण्यात आला आहे.

 

सुरक्षा नियमपालन अटीवर ठराविक भागात

पथारी व्यवसाय करण्यास परवानगी

पथारी व्यावसायिकांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 या दरम्यान व्यवसाय करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे. शिवाजी रोड, बाजीराव रोड, शनिवारवाडा, हडपसर, सातारा रोड, नगररोड, सिंहगड रोड, धायरी फाटा, पौड रोड, जंगली महाराज रोड, एफसी रोड, गणेश खिंड रोड भागांत व्यवसाय करता येणार आहे.

सर्व पेठा सील-

सादडी सदन,रविवार पेठ,रांका ज्वेलर्स रविवार‌पेठ, बुरडी पूल,बालाजी फरसाण पालखी विठोबा,पांगूळ आळी,कसबा पेठ,सोमवार पेठ,मंगळवार पेठ,ढोर गल्ली, जवळ जवळ सर्व गल्लीबोळातून ‌एकमेकाशी संपर्क होऊ न देण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

कंटेन्मेंट झोन कुठले?

मध्यवर्ती पुण्यातल्या सर्व पेठा (नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ वगळून), पर्वती दर्शन नीलायम, दांडेकर पूल, तळजाई वस्ती, शिवदर्शन, दांडेकर पूल, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, काकडे वस्ती, मीठानगर, कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, बालाजीनगर, धनकवडी- गुलाबनगर, अप्पर इंदिरानगर, प्रेमनगर, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, शिवाजीनगर -म. गांधी झोपडपट्टी, येरवडा ताडीगुत्ता, जयप्रकाशनगर, गांधीनग ,नागपूर चाळ, फुलेनगर- येरवडा, धानोरी-कळस, वैदूवाडी, गोसावीवस्ती, सय्यदनगर, गुलामअलीनगर, सातववाडी, माळवाडी, हांडेवाडी, वेताळनगर, हडपसर- आदर्श कॉलनी, मीनाताई ठाकरे नगर, कोथरूड – शिवतारा सोसायटी, चंद्रगुप्त सोसायटी, ताडीवाला रस्ता, वडगाव शेरी, गणेशनगर, गुलटेकडी, डायस प्लॉट

कोरोनाचे हे  कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दूध आणि भाजीपाला तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा जसे स्वयंपाकाचा गॅस, पुणे महापालिका, पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक परिस्थिती लक्षता घेऊन घरपोच देण्यात येणार आहे. किंवा मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचे पालन करून देता येईल. या परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा, औषध विक्रीची दुकाने, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालये, व्यक्तींना आणि त्यांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकानांना वार ठरवून देण्यात आले आहेत.

नॉन कंटेन्मेंट झोन मध्ये  

कोणत्या वारी  कोणते दुकानं सुरु राहणार

सोमवार – इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय साहित्य, मोबाइल विक्री आणि दुरूस्ती, इलेक्ट्रिक वस्तू विक्री आणि दुरूस्ती, भांड्यांची विक्री दुकाने, ईस्त्री व लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाई, फोटो स्टुडिओ, सोने-चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, रेनकोट, छत्र्या, प्लॅस्टिक शिट विक्रीची दुकाने.

मंगळवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्य साधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, पूजा साहित्य विक्री, तयार फर्निचरची विक्री; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने

बुधवार– इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय साहित्य, मोबाइल विक्री आणि दुरूस्ती, इलेक्ट्रिक वस्तू विक्री आणि दुरूस्ती, भांड्यांची विक्री दुकाने, ईस्त्री व लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाई, फोटो स्टुडिओ, सोने-चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने.

गुरुवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्य साधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, पूजा साहित्य विक्री, तयार फर्निचरची विक्री; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, सोने-चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने, रेनकोट, छत्र्या, प्लॅस्टिक शिट ई. विक्रीची दुकाने.

शुक्रवार – इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाइल विक्री व दुरूस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरूस्ती, भांड्याची विक्री दुकाने, ईस्त्री व लॉंड्री दुकान, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाईचे दुकान; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, माल वाहतूक कंपन्यांची गोदामे.

शनिवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्य साधनसामग्री, कापड दुकाने, डेअरी उत्पादने वाहन दुरुस्ती साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, फोटोस्टुडिओ, फोटोफ्रेमची दुकाने, ईस्त्री व लॉंड्री दुकान, बांधकाम साहित्य विक्री, पूजा साहित्य विक्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, तयार फर्निचरची विक्री; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, माल वाहतूक कंपन्यांची गोदामे. रेनकोट,छत्र्या,प्लास्टिक शिट्,ई .विक्रीची दुकाने.

रविवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्यसाधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृहोपयोगी सामग्री, स्टेशनरी दुकान, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्री, कपडे शिलाईचे दुकान; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, माल वाहतूक कंपन्यांची गोदामे. रेनकोट,छत्र्या,प्लॅस्टिक शिट,ई. विक्रीची दुकाने.

नव्याने जारी केलेले ६५ कंटेन्मेंट झोन हे पूर्णपणे सील केले जाणार असून, यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरूळीत ठेवण्यासाठी या सेवा देणाऱ्या व्यक्तीं व्यतिरिक्त अन्य नागरिकांना प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर या भागात रूग्णवाहिका व केवळ महापालिकेच्या सेवा देणाऱ्या वाहनांनाच (पाण्याचे टँकर, अग्निशामक दलाची वाहने, कचरा वाहतुक गाडी ) व अत्यावशक सेवा देणारे कर्मचारी व अधिकारी यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
कंटन्मेंट क्षेत्रा व्यतिरिक्त इतर भागात नव्याने काही सवलती देण्यात आल्या असल्या तरी, एखाद्या इमारतीत अथवा गृह निर्माण सोसायटी येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आढळून आल्यास तो भाग सील करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तर कंटन्मेंट झोन बाहेरील भागातील मॉल, रिक्षा / कॅब, वाहतुक करणाºया बसेस, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर,स्पा हेही पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

परवानगी देण्यात आलेले :
* उद्योग व व्यवसाय : सर्व प्रकारचे दवाखाने, इस्पितळे, औषध विक्रीची दुकाने, अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय यात औषधी, वैद्यकीय उपकरणे व त्यांना लागणारा कच्चा माल इ. तसेच ज्या ठिकाणी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी कामामध्ये सातत्य ठेवावे लागते अशा बाबी : माहिती व तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती तसेच पॅकेजिंग करिता लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग जसे ब्रेड उत्पादक कारखाना, दुध प्रक्रिया केंद्र, पिठाची गिरणी, दालमिल.

* घरकाम करणाऱ्या व्यक्ती : कंटन्मेंट क्षेत्राबाहेर राहणाºया कोणत्याही व्यक्तीच्या घरी त्या घरमालकाची इच्छा असल्यास स्वेच्छेने काम करता येईल. परंतू कंटन्मेंट भागातील व्यक्तीस हे काम करता येणार नाही.

* ज्येष्ठ नागरिक : ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मदतीसाठी लागणाऱ्या व्यक्ती, रूग्णसेवेसाठी मदतनीस व्यक्ती, हेल्पर, घरकाम करणारी व्यक्ती, वाहनचालक इ.

*शासकीय कार्यालये : सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये उपसचिव आणि समकक्ष व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे सर्व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहू शकतात. तर त्यांच्या अन्य कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या ३३ टक्के कर्मचारी वापरून सदर कार्यालय सुरू ठेवता येईल. राज्य शासनाची सर्व कार्यालये शासनाने विहित केलेल्या कर्मचारी मर्यादेत सुरू ठेवता येणार आहेत.

* वर्तमानपत्रे : वर्तमानपत्रे वितरण सकाळी ७ ते सकाळी १० पर्यंत वितरित करता येतील. यावेळी वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक राहिल. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया,केबल सर्व्हिस सुरू राहतील.

* वित्तीय क्षेत्र : सर्व बँका, एटीएम, सहकारी पतसंस्था, विमा कंपन्या व आरबीआयने नियंत्रित केलेल्या आर्थिक संस्था कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.

* ई-कॉमर्स : ई-कॉमर्सच्या माध्यमातून घरपोच अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करता येईल. तसेच कुरिअर सेवाही सुरू राहतील.

* वाहन वापर : केवळ अनुज्ञेय कामांसाठी वैयक्तिक वाहन वापरता येईल. तथापि चार चाकी वाहनामध्ये चालका व्यतिरिक्त दोन व्यक्तींना परवानगी असेल. तर दुचाकी वाहनात मागच्या सीटवर व्यक्तीला नेता येणार नाही.

* माहिती तंत्रज्ञान : माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यवसाय त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांवर सुरू ठेवता येतील. तसेच डाटा व कॉल सेंटरमधील कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या वापर करून सुरू ठेवता येईल.

* खाद्य पदार्थ सेवा : खाद्य पदार्थ सेवा देणारे म्हणजे हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा सुरू ठेवता येईल.

* बांधकाम विषयक : बाहेरील मजूर न आणता कामाच्या जागेवर मजुरांची राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशी बांधकामे आणि अपांरपारिक उर्जा प्रकल्पांची कामे करता येतील. पुणे मनपाने ज्या पूर्व पावसाळी कामांना, मेट्रोच्या कामांना, धोकादायक इमारतीबाबत करावयाची कारवाई तसेच पूरपरिस्थिती होऊ नये म्हणून ज्या कामांना पूर्व परवानगी देण्यात आली आहे अशी कामे सुरू राहतील.

* पथारी व्यावसायिक : अधिकृत पथारी व्यावसायिकांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत २ पथारी व्यावसायिकांमध्ये १० मिटरचे अंतर ठेऊन व्यवसाय करता येईल.

* सुरक्षा व सेवा व्यवस्था : रहिवासी संकुल व कार्यालयांना लागणाºया सेवा व सुरक्षा पुरविणाºया खाजगी संस्था सुरू राहतील.

* दुकाने : कंटन्मेंट झोनच्या व्यतिरिक्त मनपा क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे मॉल बंद राहतील. मात्र, व्यापारी संकुलामधील केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. तसेच रस्त्यांवरील स्वतंत्र दुकाने, रहिवाशी कॉलनीतील दुकाने व रहिवाशी संकुलातील दुकाने उघडी राहतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवाजीनगर एसटी टर्मिनल तातडीने पूर्ण व्हावे-आमदार शिरोळे यांच्या मागण्या

पुणे : मेट्रो रेल्वेचा दुसरा टप्पा, शहरातील अंतर्गत रिंग...

देशात दोन लाख नव्या बहुद्देशीय सहकारी सेवा संस्थासहकार क्षेत्राला ११ वर्षांत ४ लाख २१ हजार कोटी

सहकारी सोसायट्यांच्याा संगणकीकरणासह गोदामांच्या उभारणीलाही गती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा २१ डिसेंबर रोजी ‘संकल्प मेळावा’

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मित्रपक्षाचे नेते...