Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शहरातील विसर्जन मिरवणूक २८ तास ; लष्कर भागातील विसर्जन मिरवणूक सहा तासात संपन्न

Date:

पुणे-भवानी पेठेतल्या गोकुळ वस्ताद तालीम तरुण मंडळ, ट्रस्ट या शेवटच्या मंडळाच्या बाप्पाचे आज दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नटेश्वर घाटावर विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडल्याचे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले. यंदाची विसर्जन मिरवणूक गतवर्षी पेक्षा २५ मिनिट अगोदर मार्गी लागली असली तरी ती तब्बल २८ तास ५ मिनिट चालली. बुधवारी सकाळी आठ वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनाने कालपासून शहरात सुरू असलेल्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली तर पुणे लष्कर भागातील  विसर्जन मिरवणूक सहा तासात उत्साहाने संपन्न झाली . या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ    सायंकाळी साडेसहा वाजता भोपळे चौकात मानाचा पहिला गणपती  कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पुढे राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते नारळ वाढवून करण्यात आली . यावेळी लष्कर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश मोरे , लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर , कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते .

अंनत चतुर्दशीदिनी काल सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी शहरातील महात्मा फुले मंडई येथून पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करून सुरुवात मिरवणुकीला सुरुवात झाली होती. ती आज दुपारी २ वाजून २० मिनिटांनी संपली.

मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी चार मुख्य मार्ग होते. यामध्ये लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता या मार्गांचा समावेश होता. यांपैकी लक्ष्मी रस्त्यावरून २४१, टिळक रस्त्यावरून १९७, कुमठेकर रस्त्यावरून ४७, केळकर रस्त्यावरून १२७ असे एकूण ६१२ गणेश मंडळे या चारही रस्त्यांवरून मार्गस्थ झाली होती.

या विसर्जन कार्यक्रमासाठी एकूण ८४७ पोलीस अधिकारी, ७८७० पोलीस कर्मचारी तर एसआरपीएफ कंपनी ३ ची तुकडी असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान लष्कर भागातील आकर्षक सजावटीमध्ये आपली  मंडळाने आपल्या श्री ची  मूर्ती विसर्जन मिरवणूक काढली होती तर सिंहगर्जना पथकाच्या ढोल पथकाने सद्रीकर्ण केले .

या विसर्जन मिरवणुकीत भीमपुरा गल्लीमधील श्री राजेश्वर तरुण मंडळ , कोळसेगल्लीमधील नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळ , ताबूत स्ट्रीटवरील ताबूत स्ट्रीट तरुण मंडळ , राणी लक्ष्मीबाई  उद्यानाजवळील शिवमुद्रा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भवानी पेठेमधील श्री. शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट , भोपळे चौकातील श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ , हिंद तरुण मंडळ , शिंपी आळीमधील नवयुग तरुण मंडळ , गाडीअड्डा येथील शिव तरुण मंडळ ट्रस्ट , कुंभारबावडी बाजारमधील कुंभारबावडी तरुण मंडळ , कुंभारबावडी स्थायिक सेवा सेवा मंडळ ,जाफरींन लेनमधील नवयुग सुवर्णकार तरुण मंडळ , नवा मोदीखानामधील विश्व् तरुण मंडळ , कमलमळामधील शिवशक्ती कमलमळा तरुण मंडळ ,नवा मोदीखानामधील  उत्सव संवर्धक खाण्या मारुती देवस्थान मंडळ ट्रस्ट , सर्वात शेवटी शंकरसेठ रोडवरील धोबीघाट मित्र मंडळ ट्रस्ट आदी मंडळ सहभागी झाले होते .

यंदाच्या वर्षी  श्री दत्त समाज तरुण मंडळ , श्रीपाद तरुण मंडळ , श्रीकृष्ण तरुण मंडळ , दस्तूर मेहेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,श्री शिवराम तरुण मंडळ या मंडळांनी जाग्यावर विसर्जन केले . तर जय जवान मंडळाने नवयुग तरुण मंडळाबरोबर आपली विसर्जन मिरवणूक काढली . हिंद तरुण मंडळाने  देशभक्तीपर नृत्ये सादर केली . हि नृत्ये बघण्यासाठी गर्दी झाली होती . तर शिवांध ढोलपथकाने सहभागी झाले होते . उत्सव संवर्धक खाण्या मारुती देवस्थान मंडळ ट्रस्ट फुग्यांची सजावट केली होती . कुंभारबावडी स्थायिक सेवा सेवा मंडळाने शंकर महादेव त्रिशूल देखावा , नवयुग सुवर्णकार तरुण मंडळाने आकर्षक फुलांची सजावट , धोबीघाट मित्र मंडळाने बजरंगबली हनुमान हलता देखावा , विश्व् तरुण मंडळाने विठ्ठल रुक्मिणी , संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमाचा देखावा , श्रीकृष्ण तरुण मंडळाने शिवमहल देखावा सादर केला होता .

शिवमुद्रा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवक सहभागी होऊन संगीताच्या तालावर नृत्यात सहभागी झाले होते . लष्कर भागातील हे एकमेव मंडळ लक्ष्मी रोडमार्गे शहराच्या मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले . त्यानंतर श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ देखील शहराच्या टिळक रोडवरील मिरवणुकीत सहभागी झाले . हिंद तरुण मंडळामध्ये महिला भगिनी मोठ्या संख्येने यंदाच्या वर्षी देखील सहभागी झाल्या होत्या . तर ताबूत स्ट्रीट तरुण मंडळाच्या मिरवणुकीत दोन बालचमूंनी आकर्षक नृत्ये सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली . बुटी स्ट्रीटवरील वीर शैव लिंगायत गवळी समाजाचा पापा वस्ताद गवळी तालीम आपली विसर्जन मिरवणूक सकाळी काढली . या मिरवणुकीत गवळी समाज बांधव सहभागी झाले होते . तसेच भगवे फेट्यामध्ये महिला सहभागी झाल्या होत्या . मंडळाच्या स्वतःच्या ढोल लेझीम पथकाच्या तालावर झिम्मा फुगडी खेळत होत्या .

पोलीस बंदोबस्त

या विसर्जन मिरवणुकीसाठी १ सहाय्यक पोलीस आयुक्त , ६  पोलिस निरीक्षक , १६ पोलिस अधिकारी , २२५ पोलिस कर्मचारी वर्ग , १५ होमगार्ड , ३० पोलिस मित्र विशेष परिश्रम घेतले . सर्वांच्या सहकार्यामुळे हि विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांनी सांगितले .

 विविध सामाजिक संस्थांच्यावतीने स्वागत

पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीच्यावतीने सेंटर स्ट्रीट पोलीस चौकीजवळ स्वागत कक्ष उभारून सर्व मंडळाचे बापूसाहेब गाणला यांनी श्रीफळ आणि पुष्पगुछ देउन स्वागत केले . यावेळी इसाक जाफर , अच्युत निखळ , इमाद सय्यद , रे फर्नाडिस , बलबीरसिंग कलसी , रणजित परदेशी , संदीप भोसले , पोपट गायकवाड , मन्नू कागडा आदी उपस्थित होते . तसेच ऑल इंडिया जमेतुल कुरेशी वर्किंग कमिटीच्यावतीने कुरेशी मस्जिद येथे स्वागत कक्ष उभारून हसन कुरेशी यांनी सर्व मंडळाचे  श्रीफळ आणि पुष्पगुछ देउन स्वागत केले . यावेळी सादिक कुरेशी , अब्दुल कुरेशी , आरिफ कुरेशी , अबरार कुरेशी , अब्बास कुरेशी , राजी कुरेशी व युसूफ बागवान आदी मान्यवर उपस्थित होते . इंडियन मुस्लिम फ्रंटच्यावतीने मंडळाचे स्वागत  फ्रंटचे अध्यक्ष मुन्नवर कुरेशी यांच्या हस्ते  श्रीफळ आणि पुष्पगुछ देउन करण्यात आले .कर्तव्य फाउंडेशनच्यावतीने सर्व मंडळाचे विकास भांबुरे , अशोक देशमुख , निलेश कणसे , अय्युब खान यांनी स्वागत केले .

पुलगेटजवळील डेक्कन टॉवरमागील नवा कालव्यावर  भीमज्योत मित्र मंडळाच्यावतीने  जीव रक्षक आणि अग्निशमन कर्मचारी बांधवाना अल्पोपहार वाटप  मंडळाचे अध्यक्ष नितीन आडसुळे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी विजय वैराट , पिंटू साळवी , विशाल गायकवाड , आनंद शितोळे , आदींनी विशेष परिश्रम घेतले .

 विसर्जन मिरवणूक रद्द करून त्या खर्चामधून – आदर्श सामाजिक उपक्रम

लष्कर भागातील सैफी लेनमधील श्री शिवराम तरुण मंडळाने आपली विसर्जन मिरवणूक रद्द करून त्या खर्चामधून एक रुग्णास व्हील चेअर , अपंगास तीन चाकी सायकल , दोन रुग्णांना कुबड्या लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांच्याहस्ते देण्यात आल्या . अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष असिफ शेख यांनी दिली . तसेच गणेशोत्सव काळात दहा दिवस अन्नदान आणि महिलांना साड्या वाटप करण्यात आले .

पोलीस मित्र

पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३० युवकांनी विसर्जन मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस मित्र म्हणून काम केले . ट्रायलक चौक , गुडलक चौक , कुरेशी मस्जिद चौक , भोपळे चौक येथे या युवकांनी पोलीस मित्र म्हणून काम केले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...