पुणे- मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुकीला जल्लोषात सकाळी सुरुवात झाली आहे. पालकमंत्री, महापौरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरवात झाली आहे. सबसे बडा खिलाडी अशी ओळख असलेले कार्यकर्त्यांच्या आणि अनेक विद्यमान नेत्यांच्या मनी वसलेले माजी खासदार सुरेश कलमाडीही मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन चार वाजता झाले .पुण्यातील रस्त्यांवर सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या . मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची महापौर टिळक व पालकमंत्री बापट यांच्या हस्ते आरतीनंतर आज (मंगळवारी) सकाळी साडेदहा वाजता चांदीच्या पालखीतून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.
ढोल-ताशा पथकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लक्षवेधी बँड पथक आदींनी ही मिरवणूक मंडईतून प्रस्थान करून नंतर लक्ष्मीरोड मार्गे अल्का चौकात दाखल होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मात्र प्रचंड उत्साहात मिरवणुकीचा जल्लोष पाहिला मिळतो. कसबा गणपतीच्या मिरवणुकीत प्रभात बँड, रमणबाग व कामायनी ही पथके असतील. जनजागृतीसाठी विविध पथके होती.
ढोल-ताशाच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहात भक्तिभावाने नटेश्वर घाटातील हौदात चार वाजून एक मिनिटाने कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
दरम्यान शेतक-यांच्या आत्महत्या थांबाव्यात, अशी प्रार्थना आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या चरणी केली.
महात्मा फुले मंडईजवळ आज विसर्जन मिरवणुकीत पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला आज विसर्जन मिरवणुकीत शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण केला व श्रींचे दर्शन घेतले. श्री गणेशाला वंदन करून त्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या. गोऱ्हे यांच्या हस्ते आज तुळशीबाग परिसरातील गजानन मित्र मंडळाच्या गणपतीची आरती केली. या वेळच्या मिरवणुकीत पुण्यातील छोटा गणेशभक्त ऋतुराज कालेकर बाहुबलीच्या रूपात आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत सहभागी झाला. पारंपरिक वेषभूषा करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलावर्गालाही शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या.
विधानपरिषदेतील व काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गो-हे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार सुरेश कलमाडी, माधुरी मिसाळ, शरद रणपिसे, उल्हास पवार, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी महापौर अंकुश काकडे, विश्वजीत कदम, सतीश देसाई, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते.