‘लायन्स क्लब’कडून २८ टन निर्माल्य संकलन

Date:

पुणे : लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलच्या (डीस्ट्रीक्ट ३२३४ डी २) वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तब्बल २८ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील चाळीस लायन्स क्लबच्या १००० हून अधिक सदस्यांनी सकाळी ९ वाजल्यापासून २८ विसर्जन घाटावर उभे राहून गणेशभक्तांना निर्माल्य दान करण्याचे आवाहन करत हे निर्माल्य संकलन केले. लायन्स क्लब्जचे प्रांतपाल रमेश शाह यांच्या हस्ते धनकवडी येथे निर्माल्यदान उपक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी उपप्रांतपाल अभय शास्त्री, राजकुमार राठोड, मुकुंद खैरे, विक्रम शिंदे, पराग देशपांडे, आनंद आंबेकर, अॅड बिपीन पाटोळे, राजेंद्र गोयल, डॉ. सतिश देसाई, संतोष पंडित, भरत जैन, प्रदीप पानघंटी, अंजना राठोड, मेघना शिंदे, परिणीता देशपांडे, वसंत वर्पे, किरण जाधव हे मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे आपली नदी आणि जलस्त्रोत स्वच्छ राखण्यात आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या कार्यात महापालिकेला मोलाची मदत झाल्याचे प्रांतपाल रमेश शाह म्हणाले. संकलित झालेले निर्माल्य खतनिर्मितीसाठी महानगरपालिकेकडे सुपूर्त करण्यात आले. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचे लायन्स स्वयंसेवकांना सहकार्य लाभले. गेली १४ वर्षे ‘लायन्स’कडून हा उपक्रम राबविला जातो. विठ्ठलवाडी घाट, राजाराम पूल, दत्तवाडी घाट, एस. एम. जोशी पूल, पुलाची वाडी, लकडी पूल, विठ्ठल मंदिर घाट, ओंकारेश्वर घाट, संगम घाट, होळकर घाट, वडगाव कॅनॉल, पर्वती कॅनॉल, सारसबाग कॅनॉल, मार्केटयार्ड, धनकवडी, कात्रज रॅम्प, बिबवेवाडी, वारजे, औंध घाट, रहाटणी घाट, मोरया गोसावी घाट, गणेश तलाव आकुर्डी या ठिकाणी उपक्रम राबविला गेला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...