पी ए इनामदार यांचेही केले कौतुक
पुणे :
‘ पुणे फेस्टिव्हल ‘आयोजित गुरुवारी रात्री झालेल्या ‘ऑल इंडिया मुशायरा ‘ कार्यक्रमाचे उदघाटन सुशीलकुमार शिंदे यांनी केले. सुरेश कलमाडी अध्यक्षस्थानी होते . आबेदा इनामदार ,डॉ सतीश देसाई ,मुनव्वर पीरभॉय उपस्थित होते .
सुरेशचंद्र सुरतवाला (काव्य क्षेत्र ) ,मेहरुन्निसा दिलदार हाश्मी (काव्य क्षेत्र ) ,आणि महमदी दारूवाला मॅडम (शैक्षणिक क्षेत्र ) यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
देशभरातून नामवंत शायर मैफलीला उपस्थित होते . मंझर भोपाली ,जोहर कानपुरी ,डॉ .नसीम निखत ,शबीना आदीब ,शफिक अबिदी ,मुख्तार युसुफी ,अफझल मंगलोरी ,टिपिकल जगत्याली ,खुशबू शर्मा ,मुमताज पीरभॉय यांनी रसिकांची वाहवा मिळवली .
‘सुरेश कलमाडी यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून केलेले काम कौतुकास्पद आहे ,देशात असे कोणतेही काम नाही की जे कलमाडी यांनी केले नाही .मी त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याला सलाम करतो . ‘असे उद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले . सुख -दुःखात आम्ही सुरेश कलमाडी यांच्या सोबत राहू ‘असा शब्दही त्यांनी दिला .
शायरी मनाला भिडते आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो .मी हि अशा मैफलीचा आस्वाद घेतला आहे ‘ असे शिंदे म्हणाले .हिंदू -मुस्लिम भेद न बाळगता सर्वानी मानवतेसाठी कार्यरत राहावे ‘असे आवाहन शिंदे यांनी केले
पी ए इनामदार यांनी प्रास्ताविक केले .
शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात पी ए इनामदार यांनी केलेल्या कामाचेही शिंदे यांनी कौतुक केले . यावेळी सुरेश कलमाडी यांनी मनोगत व्यक्त केले . सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
इकबाल अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले . वाहिद बियाबानी यांनी आभार मानले .

