पुणे–
३० व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या ‘मिस पुणे फेस्टिव्हल’स्पर्धेत कृष्णा वैद्य यांनी प्रथम क्रमांक मिळवून मानाचा मुकुट मिळवला.द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे काविया ज्योती व सिम्रन नाईक यांना मिळाला. पुणे फेस्टिवल चे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे व उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी विजेत्यांचा सत्कार केला.याबरोबरच बेस्ट स्माईल,बेस्ट हेअर, बेस्ट फिटनेस मॉडेल, मिस फेवरेट आणि मिस फोटोजेनिकच्या मानकऱ्यांची देखील निवड करण्यात आली असून बेस्ट स्माईल – सानिया चौधरी,बेस्ट हेअर- रुची हेंद्रे , बेस्ट फिटनेस मॉडेल- पूजा मिरारी, मिस फेवरेट – स्नेहल खोमणे आणि मिस फोटोजेनिक-सृष्टी गव्हांडे यांची निवड करण्यात आली.अभिनेत्री प्राजक्ता माळी,युनायटेड नेशन्स ग्लोब डॉ राधिका वाघ आणि संयोजिका सुप्रिया ताम्हाणे यांच्या हस्ते या पाचही विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे,उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,अभिनेत्री प्राजक्ता माळी,मॉडेल अभ्यंग कुवळेकर,मोहन टिल्लू,श्रावणक्वीन तन्वी माने,दिग्दर्शक देवेंद्र शिंदे, दिग्दर्शक प्रशांत गिरकर, युनायटेड नेशन्स ग्लोब डॉ.राधिका वाघ आदी उपस्थित होते.या संपूर्ण स्पर्धेचे शो डिरेक्टर, फॅशन कोरिओग्राफी व ग्रूमिंग मेंटॉर म्हणून जुई सुहास यांनी काम पाहिले.पुणे फेस्टिव्हलतर्फे सुप्रिया ताम्हाणे यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.
गेली ६ वर्षे सुरु असणाऱ्या या स्पर्धेत यंदा १८ ते २५ वर्षे वयोगटातील १०० युवतींनी सहभाग घेतला होता.त्यातील २० युवतींची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली.या २० युवतींचे चालणे,बोलणे,हसणे,रॅम्प वॉक,केशरचना,पोशाख,सर्व सामान्यज्ञान आदी सर्व बाबींचे प्रशिक्षण जुई सुहास यांनी वेगवेगळ्या सेशनमध्ये करून घेतले.आज झालेल्या अंतिम फेरीत या २० युवतींनी रॅम्प वॉक केला.त्यावेळी पहिल्या फेरीत खिंन-ख्वाब ही बनारसी ड्रेस थीम होती. त्यातून 10 युवतींची निवड केली गेली. पुढच्या फेरीसाठी हवायन थीम होती.या 10 स्पर्धकांसाठी स्पिरिट बाय शा या बुटीकचे इविनिंग गाऊन्स देण्यात आले होते. धागा डिझायनर स्टुडिओच्या अनुपम जोशी यांनी ही खास डिझाइन्स तयार केली होती.यानंतर या १० स्पर्धक युवतींची बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा, सर्
या व्यतिरिक्त तज्ञांकडून या स्पर्धकांमधून बेस्ट स्माईल,बेस्ट हेअर,बेस्ट फिटनेस मॉडेल,मिस फेवरेट आणि मिस फोटोजेनिक निवडले गेले. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या या कार्यक्रमात रेधून अकादमीच्या कलावंतानी आकर्षक नृत्याविष्कार सादर केले. आशुतोष राठोड यांनी याचे नृत्य दिग्दर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे जुगल चंदन यांनी संगीत संयोजन केले.
गेल्या 5 वर्षात या स्पर्धेतून पुढे जाऊन यशस्वी झालेल्या मॉडेल्स व अभिनेत्रींचा खास रॅम्प वॉक यावेळी सादर करण्यात आला .यासाठी प्रथा या साडी ब्रँड चे प्रायोजकत्व लाभले होते.
या स्पर्धेतील सर्व 20 स्पर्धकांना ज्वेलरी स्नेहा ब्रूच यांनी दिली असून सारा ज्वेलर्स यांनी चांदीचे खास डिझाइन केलेले 8 मुकुट दिले. या कार्यक्रमासाठी धनकवडे ग्रुपचे सहप्रयोजकत्त्व लाभले असून डिवाईन लव , इलेगन्स स्पा, सारा ज्वेलर्स , सलोन अॅपल, संस्कृता अॅकॅडमी, डेंटल वर्ल्ड यांच्याकडून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. किशोर वायकर यांनी या सर्व कार्यक्रमाची व्हिडिओ व फोटोग्राफी केली. अश्विन कोडगुले यांनी या युवतींचे फोटोशूट केले. सर्व स्पर्धकांची हेअरस्टाईल व मेकअप संस्कृता ब्युटी अकादमी यांच्याकडून केली गेली.