पुणे – व्यक्तीमत्व, बुद्धीमत्ता, सौंदर्य, सर्वसाधारण ज्ञान आणि जीवनाबद्दलचा दृष्टीकोन अशा सर्वंच बाबींमध्ये आघाडी
घेत सुरभी मोरे हिने यंदाचा मिस पुणे फेस्टिव्हलचा बहुमान मिळवला. फाल्गुनी झेंडे हिने दुसरा तर नेहा जैन हिने
तिसरा क्रमांक मिळवला. मिस पुणे फेस्टीव्हलचे संयोजन सुप्रिया ताम्हणे यांनी केले होते. त्यांनी पुणे फेस्टिव्हलच्या
संयोजन समितीचे सदस्यांनाही ऱॅम्प वॉक करायला लावले.
मिस पुणे फेस्टीव्हल स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाशिवाय ऐश्वर्या पानसरे हिचे हास्य सर्वाधिक मोहक ठरले. सावनी
राजपाठक हिला बेस्ट हेअर, हर्षिता अत्रे बेस्ट टॅलेंट, रेवती सनान्स मिस फोटोजनिक आणि आदिती परांजे मिस फेव्हरीट
ठरली. यंदाच्या २९ व्या पुणे फेस्टिव्हलमधील मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेची अंतिम फेरी आज गणेश कला क्रिडा
रंगमंदिरात झाली. यावेळी पुणे फेस्टीव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुख्य संयोजनक कृष्णकांत कुदळे, डॉ. सतीश देसाई,
काका धर्मावत मोहन टिल्लू आणि संतोष उणेचा आदी उपस्थित होते. अंतिम फेरीसाठी दहा जणींची निवड करण्यात
आली. मिस पुणे फेस्टिव्हल ठरलेल्या सुरभीला मुकुट सन २०१६ मिसेस महाराष्ट्र ठरलेल्या डॉ. राधिका वाघ यांनी प्रदान
केला. सन २०१६ ची पुणे फेस्टीव्हल अपूर्वा चव्हाण हिने फाल्गुनी तर २०१६ ची रनर अप ठरलेल्या तन्वी खरोटेने मुकुट
नेहाला प्रदान केला.
अंतिम फेरीसाठी तरूणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत टाळ्या कडकडाटात ते प्रत्येकीला प्रोत्साहनही देत होते. पुणे
फेस्टिव्हल दरम्यान झालेल्या रंगारंग कार्यक्रमात गाजलेल्या नव्या गाण्यांवर जीएमआर अकादमीच्या कलाकारांनी
बहारदार नृत्ये आणि अझिझा डान्स ग्रूपच्या मुलींनी बॅले सादर केला.
यासाठी अभिनेता अभ्यंग कुवळेकर, मराठी चित्रपट निर्माता विनय गानू, चित्रपट दिग्दर्शक प्रशांत सोलापूरकर आणि सन
२०१६ची मिसेस महाराष्ट्र डॉ. राधीका वाघ यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. मिस अंतिम फेरीत एकूण चार फे-या
झाल्या. पहिल्या फेरीसाठी महाभारत व पुरातन काळातील डिझायनर लाल साडी, दुस-यासाठी गॉथिक म्हणजे काळे
डिझायनर ड्रेसेस, तिस-यासाठी वसुंधरा या संकल्पनेसाठी गो ग्रीन रंगातील कॉटन व प्युअर सिल्कचा ड्रेस आणि अंतिम
फेरीसाठी इव्हिनिंग गाऊन अशा वेषभूषेच्या संकल्पना होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभिनेता शुभंकर एकबोटे आणि
प्रसाद क्षीरसागर यांनी केले.
या स्पर्धेसाठी एकूण २५० जणींनी प्रवेशिका दिल्या होत्या. त्यातील उपांत्य फेरीसाठी २० जणींची निवड करण्यात आली
आणि त्यातून अंतिम फेरीसाठी १० जणींची निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी २० मुलींचे डिझायनर ड्रेसेस अनुपम
जोशींच्या धागा बुटिकने दिलेले होते. विजेत्यांना डिवाईन लव्ह आणि एलिगन्स स्पाकडून गिफ्ट व्ह़ॉवचर देण्यात आली.
या सर्व स्पर्धकांची अंतिम फेरीपूर्वी झालेल्या ग्रूमिंग सेशनमध्ये फॅशन फोटोग्राफी, रॅम्पवॉक, प्रश्नोत्तरे अशी सर्व तयारी
प्रसिद्ध कोरिओग्राफर जुई सुहास यानी करून घेतली होती. मुलींचे मेकअप आयएसएएस या संस्थेने केले होते. मिस
फोटोजनिक रेवती सनान्सचा फ्री पोर्ट फोलिओ फोटोग्राफर किशोर वाईकर करून देणार आहेत. या स्पर्धेला प्रेक्षगांनी
मोठी गर्दी केली होती.