पुणे – लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग केंद्रात आज २९ व्या पुणे फेस्टिव्हलने आयोजित करण्यात आलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत
मुलांच्या गटात ऋषीकेश तर खुल्या गटात……बेस्ट बॉक्सर ठरला. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे
अभिंनंदन करण्यासाठी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष माजी खासदार सुरेश कलमाडी आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते
विजेत्यांना मेडल्स देण्यात आली. यावेळी पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष रमेश
बागवे यांनी पुढीलवर्षी ३० व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये राज्यस्तरीय मुले व मुलींच्या बॉक्सिंगच्या स्पर्धा घेण्याची घोषणा
केली.
या स्पर्धा पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत पुणे शहर, जिल्हा
आणि महाराष्ट्र पोलिस दलाच्या टीमसह एकूण ६६ खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी बॉक्सिंग असोसिएशनचे
सेक्रेटरी मदन वाणी, संघटनेचे इतर पदाधिकारी, अधिकारी आणि पंच तसेच विविध क्लबचे खेळाडू उपस्थित होते. या
स्पर्धांचे संयोजक रमेश बागवे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरेश कलमाडी
यांनी पुण्याचे नाव जगात पोचले आहे. त्यांनीच पुण्याला क्रिडानगरी अशी ओळख मिळवून दिली. पुणे फेस्टिव्हलमध्ये
सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच खेळाडूंच्या कला गुणांना, कौशल्याला वाव मिळण्यासाठीच खास क्रिडा स्पर्धांचे आयोजन
करण्यात येते. पुढील वर्षी मुलीं व महिलांच्याही बॉक्सिंगच्या स्पर्धा पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात येतील.
पुढील वर्षी ३० पुणे फेस्टिव्हल असल्याने मुले, पुरूष, मुली आणि महिलांच्या राज्यस्तरीय बॉक्सिंगच्या स्पर्धा आयोजित
करण्यात येतील. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे बागवे हे उपाध्यक्ष आहेत.
गेली सात वर्षे सातत्याने पुणे फेस्टिव्हलमध्ये बॉक्सिंगच्या स्पर्धाचे आयोजन कऱण्यात येत आहे. पुणे फेस्टिव्हलच्या क्रिडा
स्पर्धांचे समन्वयक प्रसन्न गोखले यांनी सांगितले की, मुलींच्याही बॉक्सिंगच्या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात पण
यंदा गणेशोत्सवानंतर लगेचच मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धा होणार असल्याने खेळाडूंना दुखापत होऊनये यासाठी यंदा
फेस्टिव्हलमध्ये त्याचे आयोजन केलेले नाही. दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची संख्या वाढत असून यंदाच्या
स्पर्धेत बारामतीसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे १० क्लबचे खेळाडून सहभागी झाले आहेत.
मुलांच्या गटात ४१ ते ८१ किलो वजनाच्या पाच गटात लढती झाल्या. त्यात ८१ किलो गटातील ऋषीकेश मुरकुटे बेस्ट
बॉक्सर ठरला. अन्य गटातील विजेत्यांची नावे अशी, राजाराम जाधव, आशिष कोळी, आशिष निकम, प्रतिक माने यांना
सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.



