पुणे-पुणे फेस्टिव्हलमध्ये जेष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांचे ”सुरवंदना’ हे
सदाबहार शास्त्रीय गायन बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाले. प्रथम त्यांनी राग भीमपलासमध्ये विलंबित
एकतालात; अखिया मोरी लाग रही’ ही बंदिश सादर केली. ‘मध्यलय तीनताल’ मध्ये ‘जा जा रे अपने मंदिरवा
ही बंदिश आणि द्रुत एकताल मध्ये पं.दिनकर कैकिणी रचित रचना सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
पाठोपाठ ‘पावसाळा’या ऋतूत गायला जाणारा ‘मियाँमल्हार ‘या रागातील तालमाला त्यांनी सादर केली.
तानसेन यांच्या शिष्यांनी त्यांच्यावर रचलेली ही तालमाला आहे.
‘समर्थ रामदास स्वामी’ यांनी रचलेला अभंग ‘ताने स्वर रंगवावा’ जो श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केला आहे
तो सादर करून त्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
वर्ष ऋतूत गायला जाणारा उपशास्त्रीय संगीतातील ‘कजरी’हा गीतप्रकार त्यांनी सादर केला. कजरीचे बोल
होते ‘बरसन लागी बदरिया रुमझुम के’भैरवी रागातील अवघा रंग सादर करून त्यांनी कार्यक्रमाची समाप्ती
केली.
साथसंगत हार्मोनियम – मिलिंद कुलकर्णी, तबला – विभव खांडोलकर, साइड रिदम – आदित्य आपटे, पखवाज –
गणेश पापळ, तानपुरा – कु.स्वरूपा बर्वे, कु.अबोली गद्रे यांनी केली.
याप्रसंगी महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आवर्जुन उपस्थित होत्या. गेली ३० वर्षे पुणे
फेस्टिवलसारखा दर्जेदार सांस्कृतिक महोत्सव सुरु असून ही कौतुकाची बाब आहे. असे सांगून त्यांनी
कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे फेस्टिवलला धन्यवाद दिले. त्यांच्या हस्ते आरती
अंकलीकर-टिकेकरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे,
सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख मोहन टिल्लू उपस्थित होते. पुणे फेस्टिवल चे बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख श्रीकांत
कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
गोएल गंगा ग्रुप व प्राईड पर्पल हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते
आरती अंकलीकर- टिकेकर यांचे सदाबहार शास्त्रीय गायन
Date:

