पुणे- ३१व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना आज सोमवार दि. ०२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली. याप्रसंगी अभिनेत्री गिरीजा प्रभू, अभिनेत्री मानसी मुसळे, अभिनेत्री आयली घिया व एफबीबी मिस इंडिया कॅम्पस प्रिन्सेस २०१८ विजेती अमृता चव्हाण या उपस्थित होत्या. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांसबरोबर, अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, रविंद्र दुर्वे, नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत कांबळे, अतुल गोंजारी, बाळासाहेब अमराळे, सुप्रिया ताम्हाणे, संयोगिता कुदळे, दीपाली पांढरे, निकिता मोघे, जुई सुहास, रमेश भांड, रवि चौधरी, सुहास रानवडे, राजू साठे, तानाजी चव्हाण, करूना पाटील,श्रुती तिवारी, सोनम मस्कारा आदी यावेळी उपस्थित होते. वेदमूर्ती धनंजय घाटे गुरूजी यांनी याचे पौराहित्य केले. पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना हॉटेल सारस येथील हॉलमध्ये करण्यात आली आहे. तेथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना संपन्न
Date: