पुणे-
दैनंदिन जीवनातील विविध घटनांवर आधारित किस्से व त्याचे सादरीकरण, विविध राशींच्या स्वभाव गुणांचे
विनोदी किस्से, मिमिक्रीतून राजकीय नेते, अभिनेते यांच्या आवाजातून विनोदी किस्से व हास्यषटकाराणे
हास्योत्सव एकपात्रींचा हा कार्यक्रम रंगला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद टिल्लू यांनी, हास्य्योगाद्वारे
जगण्यासाठी हसा आणि हसण्यासाठी’ जगा हा संदेश दिला.
पुणे फेस्टिवल अंतर्गत बालगंधर्व रंगमंच येथे हसायदान फाउंडेशनच्या वतीने हास्योत्सव एकपात्रींचा हा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विश्वास पटवर्धन, दिलीप हल्याळ, योगेश सुपेकर, अभय देवरे,
वनराज कुमकर,कल्पना देशपांडे या कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला. सुत्रसंचालन मकरंद टिल्लू यांनी
केले. प्रारंभी पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश
देसाई, माजी पोलीस महासंचालक दैठणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (ट्राफिक) सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते
कलाकरांचा सत्कार करण्यात आला. श्री दैठणकर यांचा कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते तर सुरेंद्र देशमुख यांचा
डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. मोहन टिल्लू व श्रीकांत कांबळे यावेळी
उपस्थित होते.
योगेश सुपेकर यांनी रामदास आठवले यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या राजकीय नेत्यांचे, मराठी व हिंदी
अभिनेते यांच्या हुबेहूब आवाजातून विनोदी किस्से सादर केले. त्याला प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून
प्रतिसाद दिला.
विश्वास पटवर्धन यांनी प्रत्येक राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये विविध विनोदी किस्यांमधून उलगडले त्याला
रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.
अभय देवरे आणि वनराज कुमकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्या अजरामर
साहित्याचे नाट्यमयरीत्या सादरीकरण केले. त्याला प्रेक्षकांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला.
कल्पना देशपांडे यांनी ‘अस्सा नवरा’ या कार्यक्रमातून नवर्यांच्या विविध गुणांचे, स्वभाव वैशिष्ट्यांचे विनोदी
किस्से सादर केले. त्याला उपस्थित महिलांचा व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे किस्से ऐकताना पुरुष
आपल्याला त्यामध्ये स्वत:ला तर स्रिया आपल्या नवऱ्याला पडताळून पाहत होत्या. त्यामुळे सभागृहात एकाच
हास्यकल्लोळ उडाला.
दिलीप हल्याळ यांनी बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या जीवनातील तीन अवस्थांवर सादर केलेले प्रसंग,
बालपण आणि तरुणपणातील किस्से आणि म्हातारपणातील एकटेपणावर प्रकाश टाकतानाच जगण्यासाठी
हसावे हसण्यासाठी जगावे हा संदेश देवून उपस्थितांची मने जिंकली.
एक पात्रींमधून उमगले हसण्याचे महत्व
Date:

