पुणे-काश्मीर मध्ये काम करणाऱ्या सर्व संस्था एकाच व्यासपीठावर येऊन परिसंवाद साधून एक नवी दृष्टी पुणे युनिव्हर्सिटीने दाखवली निमित्त होते पुणे युनिव्हर्सिटी व सेन्टर फॉर अडवान्सड स्ट्रॅटेजिक स्टडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे डायलॉग ऑन काश्मीर हा कार्यक्रम काश्मीर मध्ये विविध संस्था काम करतात ,काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद ,तसेच काश्मीर पंडितांचे पुनर्वसन ,तेथील दशतवादात अनाथ झालेल्या मुलींचे पालन पोषण ,शिक्षण तसेच वैद्यकीय सुविधा आदी कार्य बऱ्याच संस्था करत आहेत अशा सर्व संस्था एकत्र करून एक नवा अभ्यास तरुण पिढीसमोर मांडून वास्तव परिस्थीचे आवाज पोहचवण्याचे काम या परिसंवादातून साधण्यात आले .विचार व काम करण्याची पद्धत जरी भिन्न भिन्न असली तरी या सर्व संस्था शांतिदूतांचे काम करत आहेत .
या परी संवादामध्ये बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन,पांनोन काश्मीर तसेच सरहद,असीम फौंडेशन आदी संस्था सहभागी झाल्या .तिथे काम करणारी मंडळी हि पुण्यातीलच आहेत जसे बॉर्डरलेस चे अधिक कदम तसेच प नून काश्मीरचे राहुल कौल! त्यामुळे महाराष्ट्रातूनच अधिक निधी या कार्यासाठी उपलब्ध होतो त्यामुळे तेथील कार्याचा आढावा घेऊन नवा आदर्शही निर्माण केला जाईल अशी आशा आहे

