रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिघे पकडले

Date:

पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्हयात कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्याची माहिती काढून कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची प्रत्येक विभागात पथके नेमण्यात आलेली होती.
त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पुणे-सोलापूर रोड पथकाने दौंड येथे व नाशिक रोड येथील पथकाने वारुळवाडी नारायणगाव अशा दोन ठिकाणी छापे टाकून रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिघे आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकूण ६ रेमिडीसिव्हर इंजेक्शन, दुचाकी गाडी व इतर मुद्देमाल असा एकूण किंमत रुपये १,१९,७६९/- (सुमारे एक लाख एकोनीस हजार) चा माल जप्त केलेला आहे. सदर आरोपी हे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची ३२ हजार ते ४५ हजार रुपयांना विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दौंड गावचे हध्दीत हुतात्मा चौक, गणपती मंदिरासमोर ता.दौंड जि.पुणे येथे आरोपी नामे १)अक्षय राजेश सोनवणे वय २४ वर्षे रा.गांधी चौक, विठ्ठल मंदिराचे मागे, दौंड ता.दौंड जि.पुणे २)सुरज संजय साबळे वय २३ वर्षे रा.शालिमार चौक, स्वामी समर्थ मंदिराचे मागे, दौंड ता.दौंड जि.पुणे हे दोघेजण रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी ३२,०००/- रुपयाला एक याप्रमाणे विक्री करीत असताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन कि.रु.७,८७९/-, दोन मोबाईल कि.रु.२०,०००/- व होंडा ॲक्टीव्हा दुचाकी किं.रु.७०,०००/- असा एकूण ९७,८७९/- रु.चा माल जप्त करण्यात आलेला आहे.

नारायणगावजवळील वारुळवाडी ता.जुन्नर येथे राजाराम सबनिस विदयालयासमोर ता.जुन्नर जि.पुणे येथे इसम नामे रोहन शेखर गणेशकर वय २९ वर्षे रा.वाणेवाडी पो.आपटाळे ता.जुन्नर जि.पुणे येथे ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी ४५,०००/- रुपयाला एक याप्रमाणे विक्री करीत असताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन कि.रु.११,८९०/- व मोबाईल कि.रु.१०,०००/- सह एकूण २१,८९०/- रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

कोविड-१९ या साथीच्या आजाराचे औषध म्हणून वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शन बेकायदेशिररित्या, अवैध व गैरमार्गाने मिळवून ते काळया बाजाराने स्वतःचे अर्थिक फायदयासाठी कोणताही परवाना नसताना विक्री करणेसाठी जवळ बाळगून औषध विक्रेते नसतानाही खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादकाने ठरविलेल्या एम.आर.पी. किंमती पेक्षा जास्त चढया बाजाराने विक्री करताना व विकत घेताना मिळून आलेने दोघे आरोपींवर दौंड पोलीस स्टेशनला व एका आरोपीवर नारायणगाव पोलीस स्टेशनला औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ कलम ३(२)(सी), जिवनाश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ७(१)(ए)(ii), औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० चे कलम १८(सी), २७(बी)(ii), २८, २२(१)(cca), २२(३) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री.विवेक पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे,
पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,
सहा.पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, मुकेश कदम, दत्ता तांबे, सागर चंद्रशेखर, काशिनाथ राजापुरे, दगडू विरकर यांनी केलेली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...

प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याचे वृत्त बदमाशीचे ..खोडसाळ

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप...

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...