पुणे :- गांजाची तस्करी करण्याच्या आरोपावरून कात्रज परिसरात काल भारती विद्यापीठ पोलिसांनी धनंजय जाधव नावाच्या व्यक्तीला सुमारे साडेसात किलो गांजासह रंगेहात पकडले .
पो उप निरीक्षक सुबराव लाड, पो हवालदार बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, पो नाइक पवार ,पो. शिपाई . राहुल तांबे, चिचंकर, मंडलीक, अभिजीत जाधव, व रत्नपारखी असे पोलीस मांगडेवाडी, गुजरवाडी भागात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना मुस्तान हॉटेलच्या जवळ, जाधवनगर येथे आले असता, एक ग्रे रंगाचे जाकीट घातलेला इसम हा त्याच्या पाठीवर काळे रंगाची बॅग घेवुन संशयीत रित्या दिसला. त्या इसमास पोलीसाची चाहुल लागताच तो पोलीसांना पाहुन तो पळु लागल्याने त्याला थोड्याच अतंरावर त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता ना त्याने त्याचे नाव घंनजय रामा जाधव,वय २५ वर्षे, रा. साळुखे यांच्या भारतनगर येथील खोलीत, निंबाळकरवस्ती, कात्रज पुणे मूळ रा.सिध्दनाथवाडी, ता वाई, जि. सातारा असे सांगितले.त्याच्या बॅग मध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याचा संशय आल्याने बॅगची तपासणी केली असता, त्याच्या बॅग मध्ये खाकी रंगाच्या चिकट पटी चिटकविलेले तीन बॉक्स मिळुन आले, तसेच त्याच्या खाली निळ्या रंगाची कापडी लहान आकाराचे पिशवी व त्याच्या आत हिरवा सुका-ओला बोंडासह पाला दिसला, त्याचा वास घेऊन पाहिला असता, गांजाचा वास येऊ लागला.सदरच्या पिशवीमध्ये गजा हा अंमली पदार्थ असल्याचे दिसल्याने लगीच पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विष्णु ताम्हाणे यांना तपास पथकाने ब त्या ठिकाणी बोलावुन घेवुन त्यांनी खात्री करुन त्यांनीआरोपीच्या ताब्यातुन ०७ किलो ३९६ ग्रॅम वजनाचा गांजा, रेडमी कंपनीचा मोबाईल व रोख पंधराशे रुपये असा एकुण १, लाख ऐकोणिस हजार ४४० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पो उप निरीक्षक सुबराव लाड हे करीत आहेत.सदरची कारवाई हि मा.श्री श्रीकांत तरवडे सो अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा.श्री सरदेशपांडे सो पोर्न स उप-आयुक्त परि-२ पुणे शहर, माएम एम पाटील सहा.पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली व विष्णु ताम्हाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या दिमतीत तपास पथकाचे अधिकारी पो.उप-निरीक्षक श्री. सुबराव लाड पोलीसहवालदार कृष्णा बढे, कुदंन शिंदे, सराज देशमुख,राहुल तांबे, गणेश चिंचकर, सचिन पवार,महेश मंडलिक, अभिजित जाधव, आणि अभिजित रत्नपारखी यांचे पथकाने कारवाई केलेली आहे.

