पुणे-‘इनोव्हा’ मोटारीतून बेकायदेशीररित्या गोमांस वाहतूक करणा-या एकाविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास सोलापूर रोडवरील रवी दर्शन चौकात करण्यात आली. यामध्ये एक हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले. याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 23, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी विकास दत्ता शिंदे (वय 30, रा. रामटेकडी, हडपसर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी स्वामी हे अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाचे सभासद आहेत. सोलापूर रोडवरून (एमएच 12 डीवाय 0369) या इनोव्हा मोटारीतून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. स्वामी यांनी याबाबत हडपसर पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी सोलापूर रोडवरील रवी दर्शन चौकात सापळा रचून पहाटे चारच्या सुमारास विकास याला ताब्यात घेतले. मोटारीची पाहणी केली असता मोटारीत मास आढळून आले. पोलिसांनी मोटारीतील एक हजार किलो मास जप्त केले आहे. हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत.