पुणे- अच्छे दिनचे फसवे स्वप्न दाखवून लोकसभा जिंकलेल्या आणि आता स्मार्ट सिटीचे खोटे स्वप्न दाखवून महापालिका काबीज करू पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आज पुणे शहर कॉंग्रेसने जोरदार निदर्शने केली यावेळी ‘गो बॅक मोदी’..या घोषणेने परिसर दुमदुमला … … शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी , माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम ,नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेवक सुधीर जानज्योत,आमदार मोहन जोशी ,माजी महापौर कमल व्यवहारे ,दत्ता गायकवाड तसेच पालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, संजय बालगुडे, महेश वाबळे, अजित दरेकर , विलास जैन , आदी शेकडो कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी नरेंद्र मोदी येण्यापुर्वी दीड तास अगोदरच अटक केली



