बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व इतर प्रादेशिक निवडणूकींमध्ये EVM मशीनमध्ये व निवडणूक प्रक्रियेमध्येफेरफार होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. तसेच एकंदर मतदान प्रक्रियेमध्ये बरीच अनियमितता आढळून येत आहे. या EVM मशीनच्या सदोष प्रणालीमुळे लोक रस्त्यावर उतरून उपोषण आणि मोर्चे काढत आहे तर दुसरया बाजूला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आहे आणि म्हणूनच सामान्य मतदारांच्या हक्कासाठी कॉंग्रेस व
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रक्रिया राबवत मतदारामध्ये विश्वास करणे होय आणि त्यासाठीची संपुर्ण जबाबदारी ही सत्ताधार्यांची आहे. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या परिच्छेद क्र.२९ नुसार निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी EVM
मशीन VVPAT प्रणालीला जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे निपक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडेल. तसेच परिच्छेद क्र. ३१ नुसार VVPAT प्रणालीसाठी सरकारने आवश्यक आर्थिक निधी दिला पाहिजे असे असताना देखील याबाबत शिताफीने दुर्लक्ष हे सत्ताधारी करत” असल्याची टिका यावेळी चव्हाणांनी केली. पुढे
बोलताना त्या म्हणाल्या, “ सत्ताधारी भाजप पक्षाचे डॉ.सुब्रामन्याम स्वामी यांनी सुद्धा EVM मशीनबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
राज्यसभेत अल्प कालावधीसाठी चालू असलेल्या निवडणूक प्रक्रिया सुधारणा संबधित चर्चे दरम्यान मी देखील EVM मशीनसंदर्भातआणि निवडणूक प्रक्रियेविषयक अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच पुणे महानगरपालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रियेतील त्रुटींकडे देखील लक्ष वेधले होते.