पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहिद दिनानिमित्त भगतसिंग – सुखदेव – राजगुरू यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रमेश बागवे म्हणाले की, ‘‘इंग्रज सरकारने सायमन आयोगाची स्थापना केली. या आयोगाच्या विरोधात पंजाबमध्ये लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. जमाव पांगण्यासाठी पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीमारामध्ये लाला लजपत राय जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग – सुखदेव – राजगुरू यांनी ब्रिटीश पोलीस अधिकारी जे. पी. साँडर्स याची हत्या केली. या हत्या प्रकरणी या तिघांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तरूंगात फाशी देण्यात आली. या तिघांनीही आनंदाने वंदे मातरम – भारत माता की जय म्हणून फाशीचा फंदा गळ्यात स्वत: घालून घेतला व हसत मुखाने फाशीला गेले. या देशभक्तांना शतश: प्रणाम.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र दळवी, महिला अध्यक्षा पुजा आनंद, शिवा मंत्री, द. स. पोळेकर, सुरेश कांबळे, ॲड. राजश्री अडसूळ, अविनाश अडसूळ, शिलार रतनगिरी, दिपक ओव्हाळ, दत्ता पोळ, विठ्ठल गायकवाड, विजय वारभुवन, दिलीप लोळगे, दिपक ओव्हाळ आदी उपस्थित होते.

आज दि.२३/०३/२०२२ रोजी हुतात्मा भगतसिंग तसेच हुतात्मा राजगुरू , हुतात्मा सुखदेव व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सभागृह , पुणे महानगरपालिका येथील त्यांच्या प्रतिमेस. ज्ञानेश्वर मोळक,
महापालिका आयुक्त (वि) आणि शिवाजी दौंडकर, नगर सचिव पुणे मनपा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी पुणे मनपा मधील अधिकारी व सेवक उपस्थित होते

