पुणे-आर्थिक मंदी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, महागाई, गुन्हेगारी, महिलांवरती
होणारे अत्याचार आदी रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या प्रश्नांवर सरकारचे लक्ष
वेधण्यासाठी व या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशव्यापी
आंदोलन दि. ५ ते दि. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आयोजित केले आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस
कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वखाली व
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस सोनलबेन पटेल, माजी
सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शुक्रवार दि. ८ नाव्हेंबर २०१९
रोजी सकाळी ११.०० वा., फडके हौद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे पर्यंत ‘निषेध मोर्चा’
काढण्यात येणार आहे.अशी माहिती येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली .
केंद्र सरकारच्या सर्व क्षेत्रातील गैरव्यवस्थापनामुळे देशात मंदीची परिस्थिती निर्माण झाली
आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत. त्याचा
विपरीत परिणाम देशभरातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब, मागास,
अल्पसंख्यांक आणि दारिद्रय रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे.
या मोर्चास पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. रमेश बागवे, पक्षाचे आजी –
माजी आमदार, आजी – माजी नगरसेवक, पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, ब्लॉक अध्यक्ष व
कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.