पुणे-पुण्यात आठ हि आमदार भाजपचे असले तरी भाजपसाठी सर्वाधिक आव्हान असलेला मतदार संघ म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या पुणे कँटोंमेंट विधानसभा मतदार संघात आता दिलीप कांबळे यांना पुन्हा संधी देण्याएवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांचे नाव घेतले जात असताना या दोघांना डावलून या मतदार संघात नवा चेहरा म्हणून डॉ . भरत वैरागे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे वर्तविले जाते आहे. या मतदार संघात बागवे पिता आणि पुत्र यांची असलेली ताकद ,त्यांनी गेली ५ वर्षे सातत्याने जनतेचे प्रश्न घेऊन राबविलेली आंदोलने आणि अव्याहतपणे सुरु ठेवलेला अखंडित असा दांडगा संपर्क पाहता भाजपच्या वर्तुळातून पुणे कँटोंमेंट मतदार संघात आपला झेंडा फडकावयाचा असेल तर उमेदवार बदला असे धोरण स्वीकारण्यात येईल असे सांगितले जाते आहे . यामागे दिलीप कांबळे यांना पूर्वी वारंवार मिळालेली संधी आणि दोन्ही वेळेस त्यांच्यामुळे झालेली पक्षाची बदनामी यामुळे येथील भाजपचा परंपरागत मतदार देखील नाईलाजाने खेचण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नवा चेहरा पक्ष देईल असे सांगितले जाते आहे .सध्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष असलेले भरत वैरागे हे ५ वर्षे नगरसेवक होते तर त्यांच्या पत्नी ३ वेळा नगरसेवक राहिल्या आहेत .स्वर्गीय पत्रकार गोपाळराव बुधकर यांच्या प्रेरणेने कार्यकर्ता झालेल्या वैरागेहे संघ आणि हिंदू परिषदेत सातत्याने कार्यरत राहिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या सह पुण्यातील गिरीश बापट,प्रकाश जावडेकर ,संजय काकडे,अनिल शिरोळे,योगेश गोगावले अशा सर्वच नेत्यांशी त्यांचा राजकारणा पेक्षा कामाने संपर्क राहिला आहे.तर उद्यानांची उभारणी रोजगार मेळावे,आरोग्य शिबिरे,पर्यावरण,वाहतूक विषयक विविध कार्यक्रम अशा माध्यमातून त्यांनी आपला दांडगा जन संपर्क ठेवला आहे.
या उलट कांबळे हे मंत्री असल्याने त्यांचा वैरागे यांच्याप्रमाणे जनसंपर्क उरलेला नाही .कायम ते कुठल्या ना कुठल्या वादात चर्चिले गेले. तर कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे आता महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत . या समितीचा कारभार पारदर्शक पणे चालविण्या ऐवजी माध्यमांपासून दडवून ..चालविल्याचा आरोप होतो आहे. स्थायीसमिती च्या बैठकीस माध्यमांनी उपस्थित राहून माध्यमांनी वृत्तांकन करावे यासाठी ते प्रयत्न करतील असे सुरुवातीला वाटले होते पण प्रत्यक्षात ,बैठकीत काय झाले ते आपण सांगू त्याप्रमाणे माध्यमांनी वार्तांकन करावे अशीच परंपरा त्यांनी पुढे सुरूच ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना विश्वासार्ह वाटेल असाच उमेदवार दिला पाहिजे या धर्तीवर वैरागे यांचे नाव अग्रभागी असल्याचे वृत्त आहे. दरम्यान विष्णू हरिहर आणि अन्य कार्यकर्त्यांनी या मतदार संघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली असून , आयत्या वेळी पक्ष पुन्हा दिलीप कांबळे यांना संधी देईल याबाबत अनेकांना शंका आहे. कांबळे बंधू वगळून नवा चेहरा दिला तरच तो कॉंग्रेसच्या येथील बलाढ्य उमेदवाराशी सामना करू शकेल असे भाजपच्या कर्ता गोटात बोलले जाते आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसने या मतदार संघातून रमेश बागवे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे बोलले जात असून आता बागवे विरुद्ध वैरागे असा सामना दिसल्यास आश्चर्य वाटणार नाहीं असे समीक्षकांचे म्हणणे आहे.