पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ पुणे शहर भाजपने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
मुळीक म्हणाले, भाजपच्या महाजनादेश यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे त्यांनी बेकायदेशीररीत्या मंत्री नारायण राणे यांना अटक केली. पुणे शहर भाजपच्या वतीने आम्ही सरकारचा तीव्र निषेध करीत आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा वर्षा तापकीर, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शहर सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दीपक पोटे, राजेश येनपुरे, बापू मानकर, अर्चना पाटील, मानसी देशपांडे,धनंजय जाधव व युवा मोर्चाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते..

