पुणे – ‘सबसे बडा खिलाडी’ कोणी नसून पुण्यातील भाजपचे कारभारी गिरीश बापटच असतील ,पक्षप्रवेश देतानाआणि उमेदवारी देताना बापट आणि स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल असे आपल्याला वाटते अशी भूमिका मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर खासदार संजय काकडे यांनीघेतली आहे . महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी सर्वस्तरातील समाजाला सामावून घेण्याचा प्रयत्न करणार असून, त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून पक्ष वाढवू आणि पुण्याचा कारभारी गिरीश बापट यांनाच करू असे देखील खासदार संजय काकडे यांनी म्हटल्याचे वृत्त आहे
पक्षप्रवेश यासंदर्भात, कुणालाही पक्षात प्रवेश देताना स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याचे ठरलेले आहे .न्यायालयाने ज्यांच्यावर दोषारोप ठेवलेत त्यांना उमेदवारी न देण्याचे पक्षाचे धोरण आहे. यापुढे युती न करण्याचे माझे वैयक्तिक मत आहे. पुण्यातील प्रवेश स्थानिक आमदारांशी चर्चा न करता झाल्याने आमदारांमध्ये नाराजी होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी सर्व जागावर भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. या दृष्टीने महापालिकेत ९० ते १०० जागा भाजप सहज जिंकेल , शिवसेनेशी युतीची इच्छा आणि गरज पुण्यात तरी दिसत नाही. मात्र पालकमंत्री गिरीश बापट हेच पुण्याचे कारभारी असतील असे मत त्यांनी व्यक्त केले . शिवसेनेबरोबर युती होता कामा नये, अशा स्वरूपाची मागणी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपमधील अनेकांनी केली आहे, अशी माहिती खासदार संजय काकडे यांनीदिली आहे .
भाजपचे कारभारी गिरीश बापटच.. ?
Date: