कोश्यारी हटाव साठी १३ ला पुणे बंद ची हाक

Date:

पुणे-छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील एसएसपीएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ १३ डिसेंबर रोजी पुणे बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे,संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आजपर्यंत भाजपच्या नेत्याकडून अनेक वेळा अपमान करण्याच काम झाल आहे.त्याच दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान केले आहे.या विधानाला जवळपास महिना होत आला.तरी देखील राज्यपालांवर भाजप नेतृत्व कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही.ही निषेधार्थ बाब असून या घटनेच्या निषेधार्थ १३ डिसेंबर रोजी पुणे बंदचा निर्णय सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने एक बैठक घेतला असल्याचे संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी सांगितले. तसेच जो पर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविले जात नाही. तो पर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...