पुण्याच्या विमानतळावर आज विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला

Date:

पुणे- पुण्याच्या विमानतळावर आज(शनिवार) एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला. डीजीसीएने घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, विमानतळावरील रनवेवर जेव्हा विमान उड्डाण घेत होते, तेव्हा विमानासमोर एक जीप आली. यादरम्यान विमानाचा वेग 222 किमी/तास (120 नॉट्स) होता. दरम्यान पायलटने तात्काळ विमानाला टेकऑफ करुन अपघात टाळला. यादरम्यान विमानाचे फ्यूअल टँक खराब झाले. दरम्यान, विमानाला प्रवासादरम्यान इमरजेंसी लँडिंग करण्याची गरज पडली नाही आणि सुरक्षित विमान दिल्ली विमानतळावर पोहचले.

तपासादरम्यान सेवेतून बाहेर असेल विमान

डीजीसीएने एअर इंडियाला सल्ला दिला आहे की, विश्लेषणासाठी विमानातून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीवीआर)ला सुरक्षित काढून घ्या. अपघाताबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाचा तपास होऊपर्यंत याला सेवेतून बाहेर ठेवले जाईल. एअर इंडियाला पुणे एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) सोबत मिळून घटनेच्या तपासात सामील होणे आणि रनवेवर मार्किंग पाहण्यासाठी सांगितले आहे.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ए-321 विमानाच्या मागच्या भागावर घासल्याचे डाग दिसत आहेत. सध्या विमानाची तपासणी केली जात आहे. याच्या फ्लाइट रेकॉर्ड डेटाचा चांगल्या पद्धतीने तपास होईल, त्यानंतर माहिती सार्वजनिक केली जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताला सेमिकंडक्टर स्वातंत्र्याची गरज-प्रा. डॉ. मंगेश कराड

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘सेमिकंडक्टर तंत्रज्ञानावर’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन पुणे : सध्या...

महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०२६: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा...

ईडीने अनिल अंबानींचे 3716 कोटी रुपयांचे 17 मजली घर केले जप्त : 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा...

अबब गुटखा विक्री प्रकरणी ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड ! २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त- मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

आमदार जगताप यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नानंतर धक्कादायक माहिती उघडमुंबई...