जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Date:

मुंबई, दि. 6 : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या 29 जुलै 2022 रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना. पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या...

मेट्रो च्या विस्ताराला गती द्या..विकास मठकरींनी घातली साद

हिंजेवाडी ते शिवाजीनगर कोर्ट —मेट्रो कधी धावणार ??पुणेकर नागरीकांना...

पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक- डॉ. नीलम गोऱ्हे”

वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळाचा सहभाग; शाश्वत विकास...

‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य-महापौर मंजुषा दीपक नागपुरे

पुणे, दि.२०: #श्रीगुरुतेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम...