पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यावतीने पेट्रोल डीझेल भाववाढ, घरगुती गॅस महाग व दिवसेंदिवस होत असलेली महागाई विरोधात जुमलेबाज भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी ‘महागाई जुमला आंदोलन’ सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता शिवदर्शन चौक राजीव गांधी इ लर्निंग स्कूल येथे घेण्यात आले.
यावेळी अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले होते.नागरिक महागाईने त्रस्त झाले असून नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. अश्या जुमलेबाज सरकारचा निषेध या वेळी करण्यात आला. तसेच गॅस सिलेंडर,पेट्रोल डिझेल दरवाढ महागाई यावर घोषणा देण्यात आल्या निषेध करणारा फलक लावून आंदोलन करण्यात आले.यावेळी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड पर्वती ब्लॉक अध्यक्ष सतीश पवार, मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे,ताई कसबे,सीमा महाडिक, ज्योती अरवेंन,अनुसया गायकवाड,नंदा ढावरे, मामा परदेशी,दीपक ओव्हाळ,गोरख मरळ, प्रकाश अरणे, द.स.पोळेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

