ईएसआयसीच्या कोविड रूग्णालयासाठी तातडीने ऑक्सिजन पुरवठा करा-आमदार माधुरी मिसाळ

Date:

पुणे, ता. १७ – बिबवेवाडीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रूग्णालयाचा कोविडच्या उपचारांसाठी पूर्ण क्षमतेने वापर करता यावा यासाठी या रूग्णालयाला तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘कोविडच्या दुसर्‍या लाटेत रूग्णांना सर्व प्रकारचे बेड्‌स मिळताना अडचणी येत आहेत. ईएसआयसी रूग्णालयातील बेडची क्षमता १०० इतकी आहे. त्यापैकी ९० बेड्‌सवर ऑक्सिजन आणि १० बेड्‌सवर व्हेंटिलेटरद्वारे रूग्णांवर उपचार होऊ शकतात. मात्र ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी तेथे केवळ ३० रूग्णांवरच उपचार केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने ऑक्सिजन पुरवठा केल्यास आणखी ७० रूग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार आहे.’

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘पुणे महापालिकेच्या माध्यमातून हे केंद्र चालविण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, नोडल ऑङ्गिसर आणि २० एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तातडीने ऑक्सिजन पुरवठा झाल्यास रूग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकेल.  ’

व्हेंटिलेटर खरेदीसाठी २० लाखांचा आमदार निधी

पुणे शहरात गेल्या आठवडाभरापासून एकही व्हेंटिलेटरयुक्त बेड शिल्लक नसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या रूग्णालयांना व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी आमदार विकास निधीतून वीस लाख रूपये उपलब्ध करून दिले असून, प्रशासनाने खरेदीची प्रकि‘या तातडीने सुरू केली असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...