पुणे – अनेक देशांनी विदेशातून येणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केला आहे. परदेशात व परराज्यात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी व प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे. जेणे करून त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अशी मागणी भाजप चे नगरसेवक सम्राट थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
तसेच ज्या नागरिकांकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे नाहीत त्यांचे लसीकरण होत नाही. त्या नागरिकांची गैरसोय होत आहे.शासनाने यात मार्ग काढून ज्यांच्या कडे ओळखपत्र नाही अश्या नागरिकांचे सुद्धा लसीकरण करावे त्यांना लसीकरणापासून वंचित ठेऊ नये असे थोरात यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

