समाविष्ठ गावांसाठी किमान २००० कोटी रुपयांची तरतूद करा- गणेश ढोरे

Date:

पुणे -समाविष्ठ गावांसाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात किमान २००० कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी नगरसेवक गणेश ढोरे यांनी आज महापौर , उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्या यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन केली .



गणेश ढोरे यासंदर्भात असे म्हटले आहे कि,’महानगरपालिकेत सन २०१७ साली ११ गावे समाविष्ठ केली गेली त्यावेळी महाराष्ट्र राज्यात व पुणे महानगरपालिकेत सुद्धा आपले भाजपा सरकार होते. त्यावेळी आपण या ग्रामीण भाग असलेल्या ११ गावांच्या विकासासाठी किती निधी राज्य शासनाकडे मागितला होता..? तो का मिळाला नाही..?
आता नव्याने २३ गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ झाली, यासाठी आपण तब्बल ९००० कोटी रुपयांची मागणी राज्यशासनाकडे केलेली आहे. या आपल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु २०१७ साली समाविष्ठ ११ गावांसाठी आपणा आपले पक्षाच्या राज्यशासनाकडे कोणत्याही प्रकारची पुरेशी तरतूद मागितली नाही, याची ११ गावांचा लोकप्रतिनिधी म्हणून खंत वाटते. या २३ गावांच्या तुलनेने ११ गावे लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असून या गावांच्या विकासासाठी २००० कोटी रुपयांची तरतूद सुद्धा कमी पडणार आहे. आपल्या मनपा प्रशासन व सत्ताधारी यांनी ग्रामीण पार्श्वभूमीच्या ११ गावांसाठी चालूवर्षी किमान २००० कोटी रुपयांची भरीव अर्थिक तरतूद देणे अपेक्षित आहे.
पुढे गणेश ढोरे यांनी असेही म्हटले आहे कि,’ कोविड -१९ ची पार्श्वभूमी लक्षात घेता, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात कपात केली गेली यामुळे या ११ गावांतील विकाससकामांच्या बाबतीत नागरिकांचा अपेक्षांचा भंग झालेला आहे. नागरिकांच्यामागणीनुसार व गरजेनुसार चालू वर्षी किमान २००० कोटी रुपयांची तरी आर्थिक तरतूद महानगरपालिकेने या ११ गावांच्या विकासासाठी देणे आवश्यक आहे.तरी, सन २०२१-२२ महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात ११ गावांसाठी चालू वर्षी किमान २००० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद स्थायी समिती अध्यक्ष यांनी करावी व ही तरतूद मिळवून द्यावी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...