अभिमानास्पद;पुणे ‘२०२१ ग्लोबल मेयर्स चॅलेंज’मध्ये अंतिम फेरीत !

Date:

भारतातील केवळ दोन शहरे त्यापैकी पुणे

  • जगभरातील ६३१ महापौरांमधून निवड

पुणे -कोरोना महामारीशी सामना करत असतानाही अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करणार्‍या शहरांसाठी घेण्यात आलेल्या ‘ग्लोबल २०२१ मेयर्स चॅलेंज’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश झाला आहे. ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपीजच्या वतीने ‘२०२१ ग्लोबल मेयर चॅलेंज’चे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल मेयर्स चॅलेंजमध्ये ९९ देशांतील ६३१ शहरांनी अर्ज केले होते. त्यातील पहिल्या ५० शहरांत पुण्याचा समावेश आहे.
‘पुणे शहराच्या वतीने सर्व इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यसाठी महत्त्वपूर्ण पाया’ ही योजना ‘२०२१ ग्लोबल मेयर्स चॅलेंज चॅम्पियन सिटीज’ या स्पर्धेसाठी सादर करण्यात आली होती. यातील हवामान आणि वातावरण या घटकांतर्गत पुण्याची निवड झाली आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होईल. आणि यातून अंतिम १५ शहरांची निवड होईल. यात निवड होणार्‍या प्रत्येक शहराला त्यांच्या संकल्पनांची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी भरभक्कम तांत्रिक साहाय्य दिले जाईल. या स्पर्धेविषयी अधिक तपशील देताना ब्लूम्बर्ग फिलाँथ्रॉपीजचे संस्थापक मायकेल ब्लूम्बर्ग म्हणाले की, ‘‘कोरोना महामारीच्या प्रचंड आव्हानांचा सामना करत असताना, अनेक शहरे धाडसी, नावीन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापुढील काही महिन्यांमध्ये या शहरांना त्यांच्या संकल्पनांची चाचणी करण्यास मदत केल्याने शहरे अधिक सामर्थ्यवान होतील. आत्यंतिक प्रगत धोरणे व कार्यक्रम स्वीकारून ते अमलात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन लाभेल.’’

या निवडीबद्दल बोलताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘इलेक्ट्रिक व्हेईकल याविषयीची पुण्याच्या प्रस्तावित कामासाठी अंतिम स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल ‘ब्लूम्बर्ग’चे मनापासून आभार. पुणे शहर हे देशातील वास्तव्यासाठीचे सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योग यांचे केंद्र आहे. पुण्याने भक्कम नागरी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे, परंतु त्याचबरोबर झालेल्या शहराच्या विस्तारामुळे वाहन प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे. पर्यावरणस्थित वाहतूक व्यवस्थेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा आमचा संकल्प आहे.

इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांचा व्यापक स्तरावर वापर करण्याचा आमचा संकल्प आहे. पुणे शहरात विजेवर चालणार्‍या वाहनांच्या वापरासाठी योजना आखून तिची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. या योजनेची जगभरातील अन्य शहरांद्वारेही अंमलबजावणी केली जाईल. मला खात्री आहे. आम्ही राबवत असलेल्या संकल्पनेमुळे हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होईल आणि पुण्याच्या नागरिकांना उत्तम आरोग्यही लाभेल, असेही महापौर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘‘पुणे शहरात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा वापर वाढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन निधी उभारून लवकरात लवकर इलेक्ट्रिक व्हेइकल्स सुरुवात करण्याचा प्रस्ताव आम्ही ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉफीजकडे सादर केला आहे. विजेवरील वाहनांचा वापर वाढावा यासाठी कृतीयोग्य धोरणे आखणे व ही वाहने चालवण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचनांचा आराखडा महापालिका तयार करेल. यासाठीचा इव्ही निधी हा वाहनांकरिता प्रोत्साहनपर आर्थिक सवलती, चार्जिंग स्टेशन्स, इतर संभाव्य संबंधित घटक अशा सर्व गोष्टींचा एकत्रित आराखडा तयार करण्याकरिता वापरला जाईल.’’

विजेवर चालणार्‍या वाहनांचा वापर सुरू करण्याकरिता पुणे महापालिका ब्लूमबर्ग निधीचा विनियोग पुढील गोष्टींसाठी करेल
१) सिटी इव्ही रेडिनेस प्लॅन तयार करणे
२) सिटी इव्ही निधी उभारणे

पुणे महानगरपालिका गरजूंचे मूल्यमापन करेल आणि योजनेतील कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे हे निश्चित करण्याकरिता काही कार्यशाळा आयोजित करेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ठाकरे बंधू एकत्र येताच भाजपने रणनीती बदलली:शिंदे गटासाठी जागांची संख्या वाढवली, तरीही नाराजी

मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि...

आम्ही सत्तेसाठी, मग तुम्ही एकमेकांची चंपी-मालिश करायला एकत्र आलात का? संजय राऊतांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार

अदाणीला मुंबई विकणे मराठी माणसाची केलेली सेवा नाहीमुंबई-ठाकरे बंधूंच्या...

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...