पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक केलेल्या वाक्त्याव्याचा श्रीराम चौक हडपसर येथे निषेध करण्यात आला. या वेळी आंदोलकांनी प्रतीकात्मक कोंबड्या सोडून व नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले.
शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे व शिवसैनिक, युवासेना महिला आघाडी पदधिकारी यांनी नारायण राणे यांच्या विरोधात कोंबड्या सोडून तसेच नारायण राणे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून व जोडे मारून आंदोलन केले.या वेळी या नारायण राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणा बाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व संबंधित पोलीस ठाण्यात अटक करण्यासाठी निवेदन दिले.
या वेळी सचिन तरवडे,विकास शेवाळे,योगेश सातव,रोहित पवार, मंजूर शेख,प्रवीण हिलगे रोहित बालचिम, मीना बाबर ,संतोष जाधव नाना भानगिरे आयोजक टीम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

