पुणे-कंगना रनौतच्या या देशद्रोही वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज झाशीच्या राणी लक्ष्मीबाई पुतळा, बालगंधर्व चौक, पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
आपल्या महान भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांच्यापासून शहीद भगतसिंग , सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस या महान नेत्यांनी निकराचा लढा दिला. मात्र केवळ हुकूमशहांच्या पायाशी निष्ठा वाहून कालपरवा पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या कंगना रनौत या अभिनेत्रीने “1947 साली देशाला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली” असे संतापजनक वक्तव्य करून देशाच्या स्वतंत्र्यासाठी शहीद झालेल्या तमाम वीरांचा अवमान केला आहे. भारत देशाच्या अस्मितेवर हा थेट हल्ला असून कंगनावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला पाहिजे असे प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख यांनी म्हटले आहे .
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,नगरसेवक सचिन दोडके, महिला शहराध्यक्ष सौ.मृणालीनी वाणी,युवती शहराध्यक्ष सुषमा सातपुते, युवती प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे, कार्याध्यक्ष अँड.श्रुती गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या निषेध आंदोलनात सहभागी होऊन देशद्रोही कंगना रणावतच्या विरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या.

