(सर्व प्रभागांचे अधिकृत नकाशे पहा https://www.facebook.com/MyMarathiNews या पेजवर )
पुणे :राजकीय वर्तुळातील अनेकांची उत्सुकता ताणून धरलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रस्तावित प्रभागरचना जाहीर झाली आहे. 58 प्रभाग त्यात जाहीर आहेत. त्यातील 57 प्रभागांतून तीन नगरसेवक तर एका प्रभागातून दोन असे एकूण 173 नगरसेवक निवडूनयेणार आहेत . बाणेर -सूस हा प्रभाग दोन नगरसेवकांचा राहणार आहे. धानोरी-विश्रांतवाडी हा प्रभाग क्रमांक एक ठरला आहे. त्यातील तीनपैकी दोन प्रभाग अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) राखीव आहेत.2011 च्या लोकसंख्येनुसार ही प्रभारगरचना करण्यात आली आहे. त्यानुसार येरवडा हा सर्वाधिक मोठा (71390) आणि धानोरी-विश्रांतवाडी हा सर्वात छोटा (55488 लोकसंख्या) प्रभाग ठरला आहे.

येथेही राष्ट्रवादी भाजपा साथ साथ ?
बाणेर-सूस येथील प्रभागरचना चर्चेची ठरली आहे. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या सोयीसाठी बाणेर-सूस या दोन गावांचा स्वतंत्र प्रभाग करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. येथील मूळच्या प्रभागातील परिसरांना इतर प्रभागात टाकण्यात आले आहे. माजी आमदार जगदिश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांच्या जुन्या मतदारसंघाचा भाग नागपूर चाळ परिसराला जोडल्याची चर्चा आहे.
ही आहेत प्रभागांची नावे व मतदार संख्या
प्रभाग क्र. : १ धानोरी – विश्रांतवाडीव्याप्ती – शांतिकुंज व्हिला, सिद्धार्थनगर, माधवनगर, साईराम सोसायटी, कुसमाडे कॉलनी, धानोरी गावठाण, भीमनगर वसाहत, आरएनडीई कॉलनी, मुंजाबा वस्ती पार्ट, लोकप्रिय नगरी, ब्रह्मा स्काय सिटी इ.(लोकसंख्या – ५५४८८)
प्रभाग क्र. : २ टिंगरेनगर – संजय पार्कव्याप्ती – येरवडा कारागृह, कस्तुरबा हौ. सोसायटी, सिद्धेश्वर नगर सोसायटी, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, विद्यानगर, विमानतळ, कोनार्क कॅम्पस, देवकर वस्ती, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, ज्योतीजीवन हॉस्पिटल इ.(लोकसंख्या – ५६९६९)
प्रभाग क्र. : ३ लोहगाव – विमान नगरव्याप्ती – लोहगाव, खेसे पार्क, वायुसेनानगर, लोहगाव बसस्टॉप, माथाडे वस्ती, निंबाळकरनगर, खंडोबा माळ, मंत्री पार्क, वडगाव-शिंदे रोड, संतनगर, फिनिक्स मॉल, साकोरे नगर पार्ट, तुळजाभवानीनगर इ.(लोकसंख्या – ६१८३६)
प्रभाग क्र. : ४ वाघोली – इऑन आयटी पार्कव्याप्ती – चंदननगर, खुलेवाडी, हडपसर बायपास बसथांबा, पठारे-ठुबेनगर-खराडी, अशोकनगर, कवडेवस्ती, वाघेश्वर मंदिरालगत, भैरवनाथ तलाव, भारतीय जैन वसतिगृह, त्रिमूर्ती विहार, विट्ठलवाडी इ.(लोकसंख्या – ५८९१२)
प्रभाग क्र. : ५ खराडी – चंदननगरव्याप्ती – सोमनाथनगर, वडगाव शेरी, तुकारामनगर, साईनाथनगर, राघोबा पाटीलनगर, गिरिधर ओएसिस सोसायटी, थिटेनगर, चंदननगर, झेन्सॉर टेक्नॉलॉजी परिसर, खराडी गाव, सुनीतानगर, यशवंतनगर इ.(लोकसंख्या – ६७३६७)
प्रभाग क्र. : ६ वडगाव शेरीव्याप्ती – पंतनगर, न्यू कल्याणीनगर, नूरानी कब्रस्तान, रविवाज एरियाना, सत्यम शिवम सोसायटी, वृंदावननगर, रामवाडी, कारगिल विजयनगर सोसायटी, सैनिकवाडी, कल्याणीनगर पार्ट, प्रसादनगर इ.(लोकसंख्या – ६०११०)
प्रभाग क्र. : ७ कल्याणीनगर – नागपूर चाळव्याप्ती – कल्याणीनगर, आगाखान पॅलेस, पंचशील वॉटर फ्रंट, सलीम अली पक्षी अभयारण्य, जनतानगर, नवी खडकी, शास्त्रीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, संजय पार्क, एअरफोर्स एरिया, त्रिदलनगर सोसायटी इ.(लोकसंख्या – ६७७३९)
प्रभाग क्र. : ८ कळस – फुलेनगरव्याप्ती – कळस, फुलेनगर, गंगा कुंज सोसायटी, विशाल परिसर, धापटे चाळ, लक्ष्मी टाऊनशिप, मधुबन सोसायटी, येरवडा महिला कारागृह, प्रतीकनगर, भीमाशंकर सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी इ.(लोकसंख्या – ६२२७३)
प्रभाग क्र. : ९ येरवडाव्याप्ती – अण्णा भाऊ साठे रंगमंदिर, मदर टेरेसानगर, जनतानगर, येरवडा भाजी मार्केट, सुरक्षानगर, डेक्कन कॉलेज, रामनगर, केंद्रीय विद्यालय, बी.ई.जी., धारीवाल व्हिला, संगमवाडी मोझे पार्किंग, लहुजी साळवे समाधी इ.(लोकसंख्या – ७१३९०)
प्रभाग क्र. : १० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडीव्याप्ती – शिवाजीनगर, गावठाण, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, कामगार पुतळा, तोफखाना, श्रीनाथ प्लाझा, कोहिनूर इस्टेट, साखर संकुल, मुळा रोड, पुणे म.न.पा. भवन, कमलनयन बजाज उद्याल, मॉडेल कॉलनी पार्ट इ.(लोकसंख्या – ६२४८१)
प्रभाग क्र. : ११ बोपोडी – पुणे विद्यापीठव्याप्ती- बोपोडी गावठाण, प्रगतीनगर, चेतक सोसायटी, नाईक चाळ, भोसलेनगर, पुणे विद्यापीठ, कर्मवीर सोसायटी, मिथिलानगरी, भीमज्योतनगर, यशवंत सोसायटी, मॉडेल कॉलनी, लक्ष्मीनगर सोसायटी इ.(लोकसंख्या – ५७८६१)
प्रभाग क्र. : १२ औंध – बालेवाडीव्याप्ती – औंध, बालेवाडी, विजडम पार्क, प्रायमाडोमस बिल्डिंग, गगन क्लोरा, मिटकॉन स्कूल, लक्ष्मणनगर, चाकणकर मळा, औंधगाव, सिंध सोसायटी, साधू वासवाणीनगर, सकाळनगर, एनसीएल, आनंदपार्क इ.(लोकसंख्या – ६२०५०)
प्रभाग क्र. : १३ बाणेर – सुस म्हाळुंगेव्याप्ती – सूस, नानपुडे वस्ती, वर्षा पार्क सोसायटी, अमर एटर्निटी, गणेश बाग, मुरकुटे वस्ती, सम्राट अशोक सोसायटी, युथिका अपार्टमेंट, मेट्रो जाझ, म्हाळुंगे ग्रामपंचायत, बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इ.(लोकसंख्या – ३७५८९)
प्रभाग क्र. : १४ पाषाण – बावधन बुद्रुकव्याप्ती – पाषाण, बावधन बुद्रुक, पद्मावती टेकडी, सुतारवाडी, शिवनगर, सोमेश्वरवाडी, नेकलेस गार्डन, भारत इलेक्ट्रॉन लिमिटेड, पाषाण लेक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, उत्सव होम्स, गंगा लिजंड इ.(लोकसंख्या – ५८५१५)
प्रभाग क्र. : १५ पंचवटी – गोखलेनगरव्याप्ती – गोखलेनगर, पंचवटी, वेताळ टेकडी, जनवाडी, वैदुवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, शेती महामंडळ, भांबुर्डा वनविहार, चतु-शृंगी मंदिर, मॉडर्न कॉलेज, स्क्वेअर यार्ड, सेंट जोसेफ हायस्कूल, सीआयडी इ.(लोकसंख्या – ६७८२१)
प्रभाग क्र. : १६ फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणेव्याप्ती – डेक्कन जिमखाना, वकीलनगर, कर्वेनगर, स्वप्नशिल्प सोसायटी, अनुरेखा सोसायटी, नवसह्याद्री सोसायटी, भांडारकर इन्स्टिट्यूट विधी महाविद्यालय, हनुमान टेकडी, संभाजी उद्यान, कमला नेहरू उद्यान इ.(लोकसंख्या – ६७१०३)
प्रभाग क्र. : १७शनिवार पेठ – राजेंद्रनगरव्याप्ती – राजेंद्रनगर, नाना-नानी गार्डन, रमणबाग शाळा, सदाशिव पेठ, पेरूगेट, लोकमान्यनगर, हुजूरपागा शाळा, दगडूशेठ मंदिर, नाना वाडा, नारायण पेठ, नागनाथ पार, गांजवे चौक, गोकुळ सोसायटी इ.(लोकसंख्या – ६७९५१)
प्रभाग क्र. : १८ शनिवार वाडा – कसबा पेठव्याप्ती- लालमहल, कागदीपुरा, बुधवार पेठ, रविवार पेठ, रामेश्वर चौक, जुना बाजार वसाहत, पुणे सिटी पोस्ट ऑफिस, बोहरी आळी, नाना पेठ पार्ट, न्यू नाना पेठ, दारूवाला पूल, नाना पेठ फिश मार्केट, तांबोळी मशीद इ.(लोकसंख्या – ६७७०१)
प्रभाग क्र. : १९ रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटलव्याप्ती – सोमवार पेठ, मंगळवार पेठ पार्ट, ससून हॉस्पिटल कॉर्टर्स, सोमवार पेठ पोलिस वसाहत, समर्थ पोलिस ठाणे, कमला नेहरू रुग्णालय, सहजानंदनगर, सिंचन भवन, बाबूराव सणस शाळा, साई पार्क, रास्ता पेठ पार्ट इ.(लोकसंख्या – ५८९९४)
प्रभाग क्र. : २० पुणे स्टेशन – ताडीवाला रोडव्याप्ती – बंडगार्डन, लुम्बिनीनगर, आरटीओ, ताडीवाला रोड, ससून हॉस्पिटल, जनरल पोस्ट ऑफिस, रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद विद्यालय, सेंट व्हिन्सेंट स्कूल, रूबी हॉल, आगरकरनगर, पूना क्लब, जिल्हाधिकारी कार्यालय इ.(लोकसंख्या – ६७१२९)
प्रभाग क्र. : २१ मुंढवा – घोरपडीव्याप्ती – मुंढवा, कोरेगाव पार्क, पासपोर्ट सेवा केंद्र, जाधवनगर, राहुल सोसायटी, कवडेवाडी, वाडिया कॉलेज, जहांगीर हॉस्पिटल, कॅनॉट प्लेस, भैरोबा पंपिंग स्टेशन, सिटाडेल सोसायटी, मदर टेरेसा पार्क, श्रीनाथनगर इ.(लोकसंख्या – ६७५७४)
प्रभाग क्र. : २२ मांजरी – शेवाळवाडीव्याप्ती – मांजरी, केशवनगर, लोणकरनगर, गोडबोले वस्ती, श्रीकृष्ण सोसायटी, शरदनगर, गोदरेज सोसायटी, मुंढवा जॅकवेल, इंद्रप्रस्थ लॉन्स, साईनाथ कॉलनी, रिव्हर पार्क सोसायटी, कामठे मळा, हरपळे लॉॉन्स इ.(लोकसंख्या – ६१८७८)
प्रभाग क्र. : २३ साडेसतरानळी – आकाशवाणीव्याप्ती – साडेसतरानळी, कोदरेनगर, तुपणी वस्ती, सुकून व्हिलेज, सिरम इन्स्टिट्यूट हेलिपॅड, सुभाषनगर, महादेवनगर, लक्ष्मी पार्क कॉलनी, केशवनगर, कल्पतरू सेरेनिटी, मांजरी ग्रामपंचायत, हडपसर, मगरपट्टा पार्ट इ.(लोकसंख्या – ५५६५९)
प्रभाग क्र. : २४ मगरपट्टा – साधना विद्यालयव्याप्ती – मगरपट्टा, मुंढवा इंडस्ट्रियल एरिया, भोसलेनगर, शिंदेवस्ती, भगीरथीनगर, सिझन मॉल, सोमनाथनगर, सायबर सिटी, टिळेकर वस्ती, सुभाषनगर, पवार एन्क्लेव्ह सोसायटी, एंथम सोसायटी इ.(लोकसंख्या – ५६४४६)
प्रभाग क्र. : २५ हडपसर गावठाण–सातववाडीव्याप्ती – हडपसर गावठाण, गाडीतळ, गोंधळेनगर, बनकर हायस्कूल, सातववाडी, उत्कर्षनगर, नवनाथ कॉलनी, ससाणेनगर, मनपा प्रभाग कार्यालय, गंगा रेसिडेन्सी, रामोशी आळी, सावित्रीबाई फुले क्रीडांगण इ.(लोकसंख्या – ५५७८२)
प्रभाग क्र. : २६ भीमनगर – रामटेकडीव्याप्ती – भीमनगर, वैदुवाडी, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, शिवरकर उद्यान, फातिमानगर, जांभुळकर मळा, कवडे मळा, घोरपडी, गणेशनगर, दळवीनगर, सूर्यलोकनगरी हडपसर, विद्याभवन कॉलेज, एसआरपीएफ इ.(लोकसंख्या – ६७७२१)
प्रभाग क्र. : २७ कासेवाडी – हरकानगरव्याप्ती – कासेवाडी, अग्रवाल कॉलनी, सदरबाजार, न्यू नाना पेठ, भवानी पेठ, ससाणेवाडा, पूरग्रस्त कॉलनी, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, गुरुनानकनगर, चित्रगुप्त कॉलनी, पीएमसी कॉलनी, अशोकनगर, कासेवाडी झोपटपट्टी इ.(लोकसंख्या – ६८५०१)
प्रभाग क्र. : २८ महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केटव्याप्ती – टिंबर मार्केट, बापूसाहेब पाटोळे उद्यान, घोरपडी पेठ – स्वारगेट, गंजपेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई, रामेश्वर चौक, फडगेट पोलिस चौकी, कापडगंज रविवार पेठ, बोरा हॉस्पिटल, न्यू नाना पेठ, गणेश पेठ इ.(लोकसंख्या – ५७४६३)
प्रभाग क्र. : २९ खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडईव्याप्ती – खडकमाळ आळी, महात्मा फुले मंडई, संत मदर टेरेसा चर्च, मामलेदार कचेरी, राजा दिनकर केळकर संग्रहालय, घोरपडे उद्यान, सुभाषनगर, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, गंज पेठ इ.(लोकसंख्या – ६७५९२)
प्रभाग क्र. : ३० जयभवानी नगर – केळेवाडीव्याप्ती – एआरएआय हिल, वेताळ टेकडी, रामबाग कॉलनी, एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, एफटीआयआय, रेसिडेन्शियल कॉलनी, हनुमाननगर इ.(लोकसंख्या – ६०२३७)
प्रभाग क्र. : ३१ कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगरव्याप्ती – आझादनगर, गणेशकृपा सोसा., शिवतीर्थनगर, म्हातोबानगर, शिक्षकनगर, लोकमान्य कॉलनी, माधवबाग सोसा., अलकापुरी सोसा., शास्त्रीनगर, मौर्य विहार, गणेशनगर इ.(लोकसंख्या ६१११५)
प्रभाग क्र. : ३२ भुसारी कॉलनी – सुतारदराव्याप्ती – दत्तनगर, सुतारदरानगर, मातोबानगर, पं. भीमसेन जोशी उद्यान, डावी भुसारी कॉलनी, वेदविहार सोसा. नं. २, जिजाईनगर, महात्मा सोसा., वृंदावन सोसा., इंदिरा शंकरनगरी, नवभूमी इ.(लोकसंख्या – ६७१२७)
प्रभाग क्र. : ३३ बावधन खुर्द – महात्मा सोसायटीव्याप्ती – विज्ञाननगर, चांदणीनगर, आदित्य शगुन सोसा., ग्लोरिया अपार्ट., जेएसपीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कमिन्स इंडिया लि., अलंकार सोसा., एसएम टॉवर, रोहन मधुबन इ.(लोकसंख्या – ६६२१६)
प्रभाग क्र. : ३४ वारजे – कोंढवे धावडेव्याप्ती – अतुलनगर, खडकवासला, आदित्य गार्डन सिटी, न्यू कोपरे, रेणुकानगर, माई मंगेशकर रुग्णालय, वारजे पार्क, सिद्धिविनायक कॉलनी, भैरवनाथनगर, नक्षत्र सोसा., शिवणे इ.(लोकसंख्या – ६४९१९)
प्रभाग क्र. : ३५ रामनगर – उत्तमनगर शिवणेव्याप्ती – राजयोग सोसा., श्रीराम सोसा., चैतन्यनगरी, राजहंस कॉलनी, हिंगणे होम कॉलनी, नादब्रह्म सोसा., इंदिरा कॉलनी, क्षितिजा रेसिडेन्सी, देशमुखनगर, साईगणेश रेसिडेन्सी इ.(लोकसंख्या – ६७४२२)
प्रभाग क्र. : ३६ कर्वेनगरव्याप्ती – स्टेट बँकनगर, हिंगणे होम कॉलनी, इंगळेनगर, कमिन्स कॉलेज, अमृतकलश सोसा., चंद्रलोकनगरी, डहाणूकर कॉलनी, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, हिंगणे बु।।, आनंदनगर इ.(लोकसंख्या – ६७२६०)
प्रभाग क्र. : ३७ जनता वसाहत – दत्तवाडीव्याप्ती – रक्षालेखा सोसा., गणेशमळा, पु. ल. देशपांडे उद्यान, लडकतवाडी, जयभवानीनगर, चंद्रनील सोसा., दांडेकर पूल वसाहत, सीताबाग कॉलनी, गुरूकुल सोसा., सरितानगरी इ.(लोकसंख्या – ६७३३२)
प्रभाग क्र. : ३८ शिवदर्शन – पद्मावतीव्याप्ती – सारसबाग, स्वारगेट बसस्टँड, नेहरू स्टेडियम, पर्वतीगाव, एलआयसी कॉलनी, सहकारनगर, पद्मावती, अरण्येश्वर, कामगार कल्याण भवन, वीर बाजीप्रभू सोसा. इ.(लोकसंख्या – ६६५६१)
प्रभाग क्र. : ३९ मार्केट यार्ड – महर्षिनगरव्याप्ती – महर्षिनगर, डीएसके, चंद्रदीप, पीएमव्ही कॉलनी, स्वारगेट एसटी स्टँड, आयकर कार्यालय, मुकुंदनगर, गुलटेकडी, इंदिरानगर, ऋतुराज सोसा., प्रेमनगर, हमालनगर इ.(लोकसंख्या – ५९५८०)
प्रभाग क्र. : ४० गंगाधाम – सॅलिसबरी पार्कव्याप्ती – पी ॲन्ड टी कॉलनी, सिंहगड कॉलेज, मंत्री इस्टेट, रायसोनी रेसिडेन्सी, बिबवेवाडी, पितळेनगर, लुल्लानगर पार्ट., डिफेन्स कॉलनी, रम्यनगरी, पार्श्वनाथनगर, विद्यासागर कॉलनी इ.(लोकसंख्या – ५९८८२)हेही वाचा: पुणे महापालिका निवडणुकीत आरक्षणाची टांगती तलवार
प्रभाग क्र. : ४१ कोंढवा खुर्द – मिठानगरव्याप्ती – बाधननगर, मिठानगर, कोंढवा, विश्वकर्मा विद्यापीठ, राजगुरू रेसिडेन्सी, शांतिनगर, शांतिनगर हौ. सोसा., पद्मगुरू कॉलनी, कपिलनगर, यशोधन सोसा., निर्माणपुरम इ.(लोकसंख्या – ५५८२५)
प्रभाग क्र. : ४२ सय्यदनगर – लुल्लानगरव्याप्ती – रामटेकडी मंदिर, पठाणशाह बाबा दर्गा, रामटेकडी, सय्यदनगर, साई कॉलनी, महंमदवाडी, ज्ञानहिल सोसा., एनआयबीएम, कृष्णकेवलनगर, कुबेर पार्क, यश श्रीधम इ.(लोकसंख्या – ५४०२६)
प्रभाग क्र. : ४३वानवडी – कौसरबागव्याप्ती – एसआरपीएफ-२, रुबी हॉल, कुबेर गार्डन, मेपर टॉवर, महादजी शिंदे छत्री परिवार, वानवडी गाव, नेताजीनगर सोसा., कमेला वस्ती, कुबेरा गार्डन, साळुंखे विहार सोसा., केदारीनगर इ.(लोकसंख्या – ५९४१४)
प्रभाग क्र. : ४४ काळेपडळ – ससाणेनगरव्याप्ती – प्रफुल्ल कॉलनी, सय्यदनगर पार्क, वेताळनगर, ओम दिशा टॉऊनशिप, काळेबोराटेनगर, ओमकार कॉलनी, तुकाईनगर, भेकराईनगर, गुलमोहर कॉलनी, साईविहार, संतोषीमातानगर इ.(लोकसंख्या – ५५२८७)
प्रभाग क्र. : ४५ फुरसुंगीव्याप्ती – तुकाईदर्शन, एसपी इन्फोसिटी, भेकराईनगर, गंगानगर, सातववाडी, आयटी पार्क, त्रिमूर्तीविहार, शिक्षक कॉलनी, ढमाळवाडी, पापडे वस्ती, सुरेशनगर, हरपळे पार्क इ.(लोकसंख्या – ५५९५७)
प्रभाग क्र. : ४६ मोहम्मदवाडी–उरुळी देवाचीव्याप्ती – औताडेवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, वडकी, न्यू इंग्लिश स्कूल, वाडकर मळा, कोंढवा, डॉ. आंबेडकरनगर, उंड्री, वॉटर रिज सोसा., पाटीलनगर दंगार वस्ती, देवाची उरुळी इ.(लोकसंख्या – ५६०४७)
प्रभाग क्र. : ४७ कोंढवा बुद्रुक – येवलेवाडीव्याप्ती – मिठानगर, महिन पॅरेडाइज, वेताळनगर, अशोक म्युज., मदनी मशीद, नूर मशीद, गौतम बुद्ध सोसा., पिसोळी, बालाजी पद्मावतीनगर, एआरव्ही न्यू टाऊन, विद्या शिल्प पब्लिक स्कूल इ.(लोकसंख्या – ५५६६२)
प्रभाग क्र. : ४८ अप्पर सुपर इंदिरानगरव्याप्ती – रम्यनगरी, विघ्नहर्ता रुग्णालय, महेश सोसा., बिबवेवाडी, विद्यानिकेतन, गंगाधाम, साईबाबानगर, राजीव गांधीनगर, कोंढवा बु।। पार्क, त्रिमूर्ती प्रसन्न सोसा., चिंतामणीनगर इं.(लोकसंख्या – ५६८८४)
प्रभाग क्र. : ४९ बालाजीनगर–के. के. मार्केटव्याप्ती – महर्षिनगर, वसंतबाग सोसा., लीला चेंबर्स, कांचनगंगा सोसा., पद्मावतीनगर, बिबवेवाडी पार्ट, मांगवाडी, लोअर इंदिरानगर, बालाजीनगर, विवेकनगर, कात्रज पार्ट इ.(लोकसंख्या – ५८०२७)
प्रभाग क्र. : ५० सहकारनगर – तळजाईव्याप्ती – लक्ष्मीनगर, पर्वती पायथा, तुळशीबागवाले कॉलनी, सहजीवन सोसा., चिंतामणीनगर, महात्मा गांधी सोसा., धनकवडी पार्ट, पंचवटी सोसा., तळजाई पठार, मेघदूत सोसा. इ.(लोकसंख्या – ६२३९८)
प्रभाग क्र. : ५१ वडगाव – पाचगाव पर्वतीव्याप्ती – सिंहगड कॉलेज, आनंदविहार, तळजाई टेकडी पार्ट, हिंगणे खुर्द, अरविंद सोसा., महालक्ष्मी सोसा., सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, आनंदनगर, महादेवनगर, घुलेनगर, गोसावी मळा इ.(लोकसंख्या – ६७२८९)
प्रभाग क्र. : ५२ नांदेडसिटी – सनसिटीव्याप्ती – सरितावैभव सोसा., दत्तवाडी, क्यूएसटी सुविधा सेंटर, नानानानी पार्क, आनंदनगर, नऱ्हे, नांदेड फाटा, पूर्वासृष्टी, वडगाव खुर्द, सावित्रीबाई पार्क, रोहन कृतिका, कांचन हाइट्स इ.(लोकसंख्या – ६६६२६)
प्रभाग क्र. : ५३ खडकवासला -नऱ्हेव्याप्ती – किरकटवाडी, नांदेड गावठाण, मानाजीनगर पार्ट, ग्रीनलँड कौंटी, आदित्य संस्कृती, आसावरी सोसा., सीडब्ल्यूपीआरएस, डीएसके मेघमल्हार सोसा., सणस विद्यालय, मधुवंती सोसा. इ.(लोकसंख्या – ६३५२५)
प्रभाग क्र. : ५४ धायरी – आंबेगावव्याप्ती – डीएसके विश्व पार्ट, बेनकरनगर, मोकरवाडी, नऱ्हे, आंबेगाव बुद्रुक पार्ट, भूमकरनगर, विंडसर कौंटी, महादेवनगर, शंकर महाराज मठ, तुकारामनगर, स्वामी नारायण मंदिर इ.(लोकसंख्या – ५८४४७)
प्रभाग क्र. : ५५धनकवडी – आंबेगाव पठारव्याप्ती – नवले मेडिकल कॉलेज, वृंदावन सृष्टी सोसा., कृष्णकुणाल रेसिडेन्सी, खेडेकरनगर, सनयुनिव्हर्स सोसा., सिंहगड कॉलेज, शांतियोग सोसा., दत्तनगर, कुदळे बाग इ.(लोकसंख्या – ५७७१९)
प्रभाग क्र. : ५६ चैतन्यनगर – भारती विद्यापीठव्याप्ती – धनकवडी, ऊर्मिला सोसा., श्रीयश सोसा., कात्रज पार्ट, चंद्रभागानगर, कुंदननगर, गुलाबनगर, कलानगर, अक्षयनगर, नारायणी धाम, राजमुद्रा सोसा., कात्रज डेअरी, आदिशक्ती सोसा. इ.(लोकसंख्या – ५६३२७)
प्रभाग क्र. : ५७ सुखसागर नगर – राजीव गांधी नगरव्याप्ती – ग्रीनएकर रेसिडेन्सी, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, ओम अलंकार सोसा., मनमोहन पार्श्वनाथ सोसा., शांतिनिवास, स्वामी विवेकानंद विद्यालय, साईनगर, कात्रज पार्ट, वाघजाई मंदिर इ.(लोकसंख्या – ५५९७१)
प्रभाग क्र. : ५८ कात्रज – गोकुळनगरव्याप्ती – आंबेगाव बुद्रुक, साई कॉलनी, संतोषनगर, मांगडेवाडी, खिलारेवाडी, भिलारेवाडी, येवलेवाडी पार्ट, चैतन्यशिला आश्रम परिसर, खोपडेनगर, कात्रजनगर, शिवशंभोनगर, कात्रज वसाहत इ.(लोकसंख्या – ५७८४७)

