भोसरीमधील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव

Date:

पुणे, दि. ११ डिसेंबर २०२२: भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांसह भोसरी गाव, नाशिक रोड, दिघी या परिसरातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महापारेषणच्या सेन्चुरी इन्का २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रात प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त दोन नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात येणार आहे.

भोसरीमधील प्रामुख्याने औद्योगिक व इतर सर्व ग्राहकांना होणाऱ्या वीजपुरवठ्यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण) आणि श्री. राजेंद्र गायकवाड (महापारेषण) यांनी भोसरी येथील महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रासह इतर वीजयंत्रणेची संयुक्तपणे नुकतीच पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सतीश राजदीप, श्री. सतीश गायकवाड व भोसरीचे कार्यकारी अभियंता श्री. उदय भोसले उपस्थिती होती.

भोसरी एमआयडीसी व इतर परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या भोसरी आरएस-१ या अतिउच्चदाबाच्या २२०/२२ केव्ही उपकेंद्रामधील पॉवर ट्रॉन्सफॉर्मर्सची पूर्वीची क्षमता सध्या ४० एमव्हीएने कमी झाली आहे. परिणामी या उपकेंद्रातील तीनही पॉवर ट्रॉन्सफॉर्मर अतिभारित झाले आहेत. त्यामुळे वीजपुरवठ्यात काही वेळा अडथळे निर्माण होत आहेत. ते दूर करण्यासाठी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व श्री. राजेंद्र गायकवाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वीजयंत्रणेची पाहणी केली. यामध्ये महापारेषणच्या सेन्चुरी इन्का या २२०/२२ केव्ही उपकेंद्रामध्ये प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त दोन नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याबाबत संयुक्तपणे प्रस्तावित करण्यात आले. यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

सेन्चुरी इन्का उपकेंद्रातील नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मरमुळे भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांसह भोसरी गाव, नाशिक रोड, दिघी या परिसरात दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे. सध्या असलेल्या वीजवाहिन्यांची लांबी तसेच त्यावरील वीजभार कमी होणार आहे. परिणामी वीजपुरवठा देखील विनाव्यत्यय व योग्य दाबाने सुरळीत राहणार आहे. भोसरी विभाग कार्यालयाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी यावेळी दिले. तसेच भोसरी विभाग अंतर्गत भोसरी उपविभागामध्ये दिघी व इंद्रायणीनगरमध्ये तसेच आकुर्डी उपविभागामध्ये चिखली येथे नवीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...